गुजराथचे अनेक पदार्थ फेमस आहेत. त्यातील काही पदार्थ नाश्त्यासाठी लोकं आवर्जून खातात. ढोकळा, फाफडा, जिलेबी हे पदार्थ फक्त गुजराथमध्ये नसून, इतरही राज्यांमध्ये आवडीने खाल्ले जातात. महाराष्ट्रात बरेच जण नाश्त्यामध्ये ढोकळा खातात. पिवळाधमक स्पंजी ढोकळा चवीला भारी आणि रेसिपी करायला सोपी असते. पण घरात तयार करताना ढोकळा मार्केटमध्ये मिळतो तसा तयार होत नाही (Moong Dal Dhokla). काही वेळेला ढोकळा स्पंजी तयार होत नाही, किंवा प्रमाण चुकल्यामुळे चवही बिघडते. ढोकळा तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे.
काही जण बेसन, चणा डाळीचा वापर करून ढोकळा तयार करतात. तर, काही जण रव्याचा ढोकळा तयार करतात. जर घरात चणा डाळ किंवा बेसन उपलब्ध नसेल तर, आपण मूग डाळीचा वापर करून खमण ढोकळा तयार करू शकता (Cooking Tips). मूग डाळीचा वापर आपण भाजी किंवा डाळीत करतो. पण आता मूग डाळीचा ढोकळा तयार करून पाहा(No Fermentation Moong dal Dhokla recipe-check out simple breakfast recipe).
मूग डाळीचा ढोकळा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
मूग डाळ
मीठ
साखर
सायट्रिक ऍसिड
तेल
मोहरी
जिरं
हिरवी मिरची
२ कांदे चिरा आणि बनवा झटपट दही प्याज, अफलातून रेसिपी करायला सोपी
आलं
पांढरे तीळ
इनो
पाणी
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप मूग डाळ घ्या. त्यात पाणी घालून ३ ते ४ तासांसाठी भिजत ठेवा. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूग डाळ घ्या, त्यात हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात २ टेबलस्पून पाणी, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा साखर, अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड आणि अर्धा चमचा तेल घालून मिक्स करा.
ना गॅस, ना तूप-तेल, करा झटपट तिळाचे लाडू! फक्त ३ गोष्टी, आणि हाडं मजबूत
नंतर वाटीला थोडे ब्रशने तेल लावा. ढोकळ्याच्या बॅटरमध्ये एक चमचा इनो घाला, त्यात थोडे पाणी घालून मिक्स करा. दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून भांडं गरम करण्यासाठी ठेवा. वाटीमध्ये चमचाभर बॅटर ओता. त्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घ्या. १५ मिनिटानंतर ढोकळा तयार झाला आहे की नाही हे चेक करा. ढोकळा तयार झाल्यानंतर वाट्या स्टीमरमधून बाहेर काढा.
थंड झाल्यानंतर वाटीमधून ढोकळा बाहेर काढा. एका कढईत २ चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं, पांढरे तीळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्ता, चिमुटभर हिंग, चवीनुसार मीठ, साखर आणि कपभर पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे मूग डाळीचा खमण ढोकळा खाण्यासाठी रेडी.