Join us  

कांदा -लसूण न घालता करा हॉटेलस्टाइल 'भिंडी मसाला': सोपी रेसिपी- अजिबात चिकट होणार नाही भेंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 3:38 PM

No Garlic No inion Bhindi Masala : चवदार, परफेफ्ट भेंडी बनवण्यासाठी  काही कुकींग टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात यामुळे जेवणाची चव वाढते.

भेंडी म्हटलं की घरातले अनेकजण नाक मुरडतात. भेंडीची भाजी आवडते असे खूपच कमी लोक असतात तर काहीजण घरी बनवलेली असल्यामुळे जबरदस्ती ही भाजी खातात. भाजी एकच असली तरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. (No Garlic No onion Bhindi Masala)

भेंडी चिकट होते, गिळगिळीत चव होते अशा अनेकींच्या तक्रारी असतात.(How to make perfect bhindi masala) चवदार, परफेफ्ट भेंडी बनवण्यासाठी  काही कुकींग टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात यामुळे जेवणाची चव वाढते आणि घरातील सगळेजण पोटभर जेवतात. बिना कांदा, लसणाची हॉटेलस्टाईल भेंडी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. 

भिंडी मसाला बनवण्याची रेसिपी

250 ग्रॅम भेंडीची भेंडी

तळण्यासाठी तेल

1 टीस्पून जिरे

1 टीस्पून किसलेले आले

1/4 टीस्पून हिंग

3 टोमॅटो किसलेले कच्च्या टोमॅटोचा लगदा

1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर

1 टीस्पून धने पावडर

1 टीस्पून जिरे पावडर जिरे पावडर

1 टीस्पून किचन किंग

1/4 टीस्पून हळद

चवीनुसार मीठ

2 चमचे दही फेटून घ्या

1 टीस्पून कसुरी मेथी

कृती

भिंडी मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून कोरड्या कापडानं पुसून घ्या.  त्यानंतर भेंडीचे काप तळून घ्या.  तळलेले काप एका बाऊलमध्ये ठेवा.  पॅनमध्ये तेल गरम करून झाल्यानंतर त्यात जीरं किसलेलं आलं, टोमॅटोची पेस्ट घाला.

त्यात लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद, धणे, पावडर, जीरं पावडर घाला.  या मिश्रणात अर्धी वाटी पाणी, एक वाटी दही घालून एकजीव करा. झाकण ठेवून हे मिश्रण  तेल सुटेपर्यंत शिजू द्या. त्यात भेंडीचे काप, कसुरी मेथी,  कोथिंबीर घालून एकत्र करा आणि एका बाऊलमध्ये सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स