Lokmat Sakhi >Food > ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

How to make lemon juice ready mix : लिंबू महाग होण्याआधी घरात वर्षभर टिकणारे लिंबू सरबताचे प्रीमिक्स तयार करून ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 10:40 AM2024-02-19T10:40:07+5:302024-02-19T10:45:01+5:30

How to make lemon juice ready mix : लिंबू महाग होण्याआधी घरात वर्षभर टिकणारे लिंबू सरबताचे प्रीमिक्स तयार करून ठेवा..

No gas consumption-no need for fridge, a special trick to make lemon syrup in seconds-the syrup will be ready in no time. | ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

काही भागात सध्या गरमी जाणवू लागली आहे. उन्हाळ्यांत उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण लिंबू सरबत, शहाळाचे पाणी, फळांचे रस अशा अनेक रसांचे आवडीने सेवन करतो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. पाणी व्यतिरिक्त आपण लिंबू पाणी जास्त प्रमाणात पितो. लिंबू पाणी उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय ठरते. लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत (Summer Season).

ऊन्हाच्या काहिलीपासून वाचवण्यापासून ते शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम लिंबू सरबत करते. पण उन्हाळ्यात लिंबू महाग होतात (Lemon Juice Premix). शिवाय लगेच सुकतात. जर आपल्याला झटपट लिंबू सरबत हवं असेल ते ही सेकंदात? तर घरातच जास्त काळ टिकणारे लिंबू सरबताचे प्रिमिक्स बनवून ठेवा(How to make lemon juice ready mix).

लिंबू सरबताचे प्रीमिक्स करण्यासाठी लागणारं साहित्य

लिंबू

साखर

कपभर बेसन-२ चमचे रवा, कटोरी ढोकळा कधी करून पाहिलं आहे का? स्पॉन्जी ढोकळा; चवीला जबरदस्त

मीठ

कृती

सर्वप्रथम, ताटामध्ये एक कप लिंबाचा रस घ्या. नंतर त्यात ३ कप साखर घालून हलक्या हाताने मिक्स करा, व साहित्य पसरवून घ्या. जर ताट लहान असेल तर थोडे मिश्रण दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्या. ताट एका फॅनखाली ठेवा. फॅनच्या हवेखाली मिश्रण सुकवून घ्या. ७ ते ८ तासानंतर चमच्याने मिश्रण मोकळे करा. व पुन्हा ७ तासांसाठी सुकवून घ्या. जोपर्यंत मिश्रणाची पावडर तयार होत नाही, तोपर्यंत सुकवून घ्या. ३ ते ४ दिवसानंतर पावडर तयार होईल.

भाजीसाठी वाटण-ग्रेव्ही बनवायला वेळच मिळत नाही? घरगुती मसाल्याची बनवा हॉटेलस्टाईल ग्रेव्ही..

मिश्रण कोरडं झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यात मिश्रण काढून घ्या, व त्याची पावडर तयार करा. तयार पावडर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. लक्षात ठेवा सरबत तयार करताना कोरड्या चमच्याचा वापर करा. पाण्याचा हात डब्याला लावणे टाळा. एक ग्लास पाण्यात एक चमचा पावडर मिक्स करा. अशा प्रकारे लिंबू सरबत पिण्यासाठी रेडी.

Web Title: No gas consumption-no need for fridge, a special trick to make lemon syrup in seconds-the syrup will be ready in no time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.