काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की आपण नेहमीच बाहेरुन चॉकलेट, पेस्ट्री किंवा पेढा, बर्फी असे पदार्थ खातो. नैवेद्यासाठी किंवा उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड खावसं वाटलं तर ऐनवेळी काय बनवायचं असा प्रश्न पडतो. (Cooking Hacks) शिरा, खीर, पुरणपोळी असे पदार्थ नेहमीच केले जातात. काहीतरी बदल म्हणून तुम्ही घरच्याघरी बर्फी बनवू शकता. (No mawa no milk peanut barfi recipe)
बर्फी बनवण्यासाठी खोबरं, नारळ, दूध असे पदार्थ लागतात. पण कमीत कमी साहित्यात चवदार बर्फी बनवायची असेल तर तुम्ही ही नवीन रेसिपी ट्राय करू शकता. पाहूण्यांना ताटात वाढण्यासाठी, भूक लागल्यानंतर मधल्यावेळेत खाण्यासाठी ही बर्फी उत्तम आहे. इतकंच नाही तर यातील पोषक घटक तुम्हाला एर्नेजेटीक वाटण्यास मदत करतात. बराचवेळ पोट भरल्यासारखंही वाटतं. (Peanut burfi recipe mungfali ki mithai)
शेंगदाण्याची बर्फी कशी बनवायची?
ही बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून सालं काढून घ्या. शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घ्या. एका कढईत २ ते ३ चमचे तूप घाला. तूपात राजगिऱ्याचं पीठ भाजून घ्या. राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर या मिश्रणात बारीक केलेल्या शेंगदाण्याचं मिश्रण घाला. राजगिऱ्याचे पीठ आणि शेंगदाण्याचे कुट एकजीव केल्यानंतर त्यात वेलची पावडर घाला. गॅस बारीक केल्यानंतर गूळ घाला आणि सतत हे मिश्रण ढवळत राहा.
फक्त १० मिनिटात करा १ कप तांदळाचे मऊ जाळीदार डोसे; सॉफ्ट डोशांची इस्टंट रेसिपी
एका ताटाल तूप लावून हे मिश्रण त्यावर घाला. व्यवस्थित थापून घेतल्यानंतर त्यावर काजू, बदाम आणि पिस्ते बारीक करून वरून घाला.त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा १ ते २ तासांनी हे मिश्रणाचं ताट बाहेर काढून चौकोनी किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराचे काप करा. तयार आहे स्वादीष्ट शेंगदाण्यांची बर्फी.