Join us  

पराठ्यात कितीही स्टफिंग दाबून भरले तरीही पराठा फाटणार नाहीच, ही घ्या स्टफिंग भरण्याची भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 3:40 PM

No More Stuff Coming Out While Rolling Paratha : If Your Paratha Filling Comes Out Here’s What You Need To Do To Make It Right : पराठ्यात अनेकदा स्टफिंग जास्त भरले गेले की पराठा लाटताना, भाजताना फाटतो, असे होऊ नये यासाठी झक्कास आयडिया...

'पराठा' हा असा पदार्थ आहे जो आपण कधीही खाऊ शकतो. बऱ्याचजणांना नाश्त्याला किंवा जेवणात पराठे खायला खूप आवडतात. पराठा हा असा पदार्थ आहे जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. काहीवेळा आपण कणीक मळून त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून पराठा करतो, तर कधी कणकेत स्टफिंग भरून पराठा तयार केला जातो. आपण पराठ्यांचे अनेक प्रकार तयार करु शकतो. पराठे बनवण्याची प्रत्येकाची पद्धत देखील वेगळी असते. पराठा करताना शक्यतो आपण त्याचा आतील स्टफिंग आधीच तयार करुन ठेवतो. मग कणीक लाटून त्या कणकेचा गोळा तयार करून त्यात हे तयार स्टंफिंग भरुन पराठा लाटला जातो(Tips To Prevent Stuffed Paranthas From Breaking).

स्टफिंग भरलेला पराठा लाटणे हे थोडे कठीण काम असते, कारण काहीवेळा पराठा लाटताना त्यातील स्टफिंगचे प्रमाण जास्त झाल्यास तो फुटतो. असा फुटलेला पराठा लाटणे शक्य होत नाही तसेच त्यातील स्टफिंग बाहेर आल्याने तो लाटताना पोळपाटाला चिकटतो. असा स्टफिंग बाहेर आलेला पराठा भाजताना देखील अनेक (If Your Paratha Filling Comes Out Here’s What You Need To Do To Make It Right) अडचणी येतात. सकाळी ऐन कामाच्या गडबडीत जर असे झाले तर कामाचा व्याप अजून वाढतो. अशावेळी आपण एक सोपी ट्रिक वापरुन जर हा पराठा लाटला तर त्यातील स्टफिंग बाहेर न येता तो व्यवस्थित लाटता येईल. याचबरोबर त्यात कितीही स्टफिंग भरले तरीही तो लाटताना फाटला जाणार नाही यासाठी पराठा लाटण्याची ही भन्नाट ट्रिक पाहूयात(No More Stuff Coming Out While Rolling Paratha).

कितीही स्टफिंग भरले तरीही पराठा लाटताना फाटणार नाही... 

पराठ्यात भरलेले स्टफिंग बाहेर येऊ नये यासाठी सर्वात आधी कणकेचा गोल मोठा गोळा करुन घ्यावा. आता एक गोळा घेऊन नेहमीप्रमाणे आपण जशी गोलाकार चपाती लाटतो त्याप्रमाणे गोल पराठा लाटून घ्यावा. आता किचनमधील चिमटीच्या मदतीने या पराठ्यावर प्रत्येकी दोन उभ्या आणि आडव्या अशा हलक्या रेषा आखून घ्याव्यात. त्यानंतर सुरीच्या मदतीने या रेषा हलक्या हाताने दाब देत कापून घ्याव्यात. आता या पराठ्याचे काहीसे चौकोनी तुकडे होतील. यातील सगळ्यात मधल्या चौकोनात स्टँफिंग चमच्याच्या मदतीने ठेवावे. त्यानंतर या पराठ्याच्या चारही कोपऱ्यातील कणकेचे छोटे त्रिकोणी आकार कापून घ्यावेत.

गरम पाण्याच्या किटलीत करा १० मिनिटांत पोडी इडली, पाहा इडलीपात्राशिवाय झटपट इडली करण्याची रेसिपी...

त्यानंतर पुन्हा मधल्या चौकोनात स्टफिंग भरून त्यावर कोपऱ्यातील कणकेचे छोटे त्रिकोणी आकार कापून घेतलेले एक एक असे करुन ठेवावे. अनुक्रमे मधल्या चौकोनात थोडे स्टफिंग मग कोपऱ्यातील कणकेचा छोटा त्रिकोणी आकारातील तुकडा असे एकावर एक ठेवून घ्यावे. कोपऱ्यातील कणकेचे छोटे त्रिकोणी आकार कापून घेतल्यानंतर आपला पराठा अधिकचे (+) चिन्ह असते त्या आकारात दिसेल.

 हिरवी चटणी काळी पडू नये, स्टोअर केल्यावरही तिचा रंग हिरवागार राहावा म्हणून... 

त्यानंतर हे उरलेले चारही भाग बरोबर मधल्या स्टफिंगवर एकावर एक ठेवून मग हाताने हलका दाब देत परत याचा गोळा तयार करुन घ्यावा. आता  त्यावर थोडेसे पीठ भुरभुरवून हा स्टफिंग भरलेला पराठा व्यवस्थित लाटून घ्यावा. अशा पद्धतीने जर आपण पराठ्यात स्टफिंग भरुन पराठा लाटला तर पराठ्यात कितीही स्टफिंग भरलेले असले तरीही पराठा लाटताना फाटणार नाही. ही सोपी ट्रिक वापरुन पराठ्यात स्टफिंग भरले तर पराठा लाटताना स्टफिंग फुटून बाहेर येणार नाही.

पापडाची चटणी खा, झणझणीत कुरकुरीत सुकी चटणी म्हणजे निव्वळ सुख, तोंडाला येईल चव...

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स