बाजारात वेगवेगळ्या कंपनींचे कंडेन्सड मिल्क विकत मिळते. असे विकतचे कंडेसन्सड मिल्क अनेक प्रक्रियांमधून जाते. ते तयार करताना दुधातून ६० टक्के पाण्याचे प्रमाण काढून टाकतात. (No Need To Buy Expensive Condensed Milk, Make It At Home) शक्यतो गायीच्या दुधाचाच वापर केला जातो. त्यानंतर त्यामध्ये विविध प्रिझर्व्हेटिव्ह घातले जातात. कंडेन्सड मिल्क गोड असते. ते गोड बनवण्यासाठी त्यात फक्त साखर नाही तर, गोड रसायने घातली जातात. ज्यामुळे त्याचा दर्जा कमी होतो. आपल्याला विविध गोड पदार्थ तयार करताना कंडेन्सड मिल्क वापरवावे लागते. त्याशिवाय आपण तयार केलेल्या गोड पदार्थाची चव एकदम भारी अशी लागत नाही. (No Need To Buy Expensive Condensed Milk, Make It At Home)
बाजारात मिळणारे कंडेन्सड मिल्क फार महाग असते. शरीरासाठी मुळात कंडेन्सड मिल्क पौष्टिक ठरत नाही. त्यात विकतचे खायचे म्हणजे शरीराची हानी करून घेतल्या सारखेच आहे. घरी हे कंडेन्सड मिल्क तयार करणे फार सोपे आहे. शिवाय त्यात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह आपण घालणार नाही. आणि अगदी कमी पदार्थांचा वापर करून तयार होते. खर्चही कमी होतो.
साहित्य: (No Need To Buy Expensive Condensed Milk, Make It At Home)मिल्क पावडर, पिठीसाखर, बटर किंवा तूप, गरम पाणी
प्रमाण:(एक वाटी मिल्क पावडरनुसार)एक वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी पिठीसाखर ४० ग्राम वितळवलेले बटर किंवा तूपअर्धी वाटी गरम पाणी
कृती:१. एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी मिल्क पावडर घ्या.२. त्यात अर्धी वाटी पिठीसाखर घाला.३. आता ४० ग्राम वितळवलेले बटर घाला. तुम्हाला बटर वापरायचे नसेल तर, तुम्ही साजूक तूप वापरू शकता.४. आता त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घाला. पाणी फार अगदी उकळेपर्यंत गरम करू नका. ५. आता सगळं छान मिक्सरमध्ये फिरवून घ्या. घट्ट अशी पेस्ट तयार होईल.
ते दिसायला विकतच्या कंडेन्सड मिल्क सारखेच तयार होईल. मात्र चवीला जास्त छान लागेल. हे तयार करायला २ मिनिटे पुरेशी आहेत. गोड पदार्थ तयार करताना किंवा ब्रेडला स्प्रेड म्हणून लावायला घरी तयार केलेले कंडेन्सड मिल्क वापरा.