Lokmat Sakhi >Food > नो ओव्हन चॉकलेट बार रेसीपी, ना शिजवायची गरज ना वाफवायचे कष्ट ! करा झटपट

नो ओव्हन चॉकलेट बार रेसीपी, ना शिजवायची गरज ना वाफवायचे कष्ट ! करा झटपट

No-oven chocolate bar recipe, no need to cook or steam! Make it quickly : चॉकलेट बार घरी तयार करणे खुपच सोपे आहे. जाणून घ्या रेसीपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 19:30 IST2025-02-09T19:29:22+5:302025-02-09T19:30:24+5:30

No-oven chocolate bar recipe, no need to cook or steam! Make it quickly : चॉकलेट बार घरी तयार करणे खुपच सोपे आहे. जाणून घ्या रेसीपी.

No-oven chocolate bar recipe, no need to cook or steam! Make it quickly | नो ओव्हन चॉकलेट बार रेसीपी, ना शिजवायची गरज ना वाफवायचे कष्ट ! करा झटपट

नो ओव्हन चॉकलेट बार रेसीपी, ना शिजवायची गरज ना वाफवायचे कष्ट ! करा झटपट

काहीही गोड खायचं म्हटलं तर भीतीच वाटते. वजन वाढेल आणि आरोग्य चांगले राहणार नाही. ती भीती योग्यच आहे. (No-oven chocolate bar recipe, no need to cook or steam! Make it quickly)पण जर गोड पदार्थ हेल्दि आणि टेस्टि असतील तर? गिल्ट फ्री राहून आनंदाने गोड खाता येईल. त्यासाठी तशा अनेक वेगवेगळ्या रेसिपी आहेतच.  त्यातील एक म्हणजे चॉकलेट बार. (No-oven chocolate bar recipe, no need to cook or steam! Make it quickly)हो अगदी मान्य आहे की, ते खुप जास्त महाग असतात. एक विकत घेऊन खायचा म्हटलं तरी जीवावर येतं. पण मग जर घरी स्वस्तात मस्त तयार करता आलं तर? ही घ्या रेसिपी. अगदी सोपी आहे. 

साहित्य:(No-oven chocolate bar recipe, no need to cook or steam! Make it quickly)
कोको पावडर, कोकोनट बटर, गूळाची पावडर, खोबरेल तेल, सुकामेवा

प्रमाण:
अर्धी वाटी कोको पावडर
अर्धी वाटी कोकोनट बटर
अर्धी वाटी गूळाची पावडर 

कृती:
१. साखर नसलेली कोको पावडर विकत मिळते. त्याच पावडरचा वापर करा. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी कोको पावडर घ्या. त्यात अर्धी वाटी कोकोनट बटर घाला.

२. जर कोकोनट बटर मिळाले नाही, तर खोवरं घ्या. त्याला मिक्सरमधून तेल सुटेपर्यंत वाटून घ्या. राहीलेले तुकडे काढा. कोणत्याही गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या. या पद्धतीने घरीच कोकोनट बटर तयार करता येते. 

३.आता त्यात अर्धी वाटी गूळाची पावडर घाला. ते सगळे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. सगळं छान मिसळून येईल याची काळजी घ्या.  

४. एका खोलगट ताटलीला खोबरेल तेल लावून घ्या. नीट लावा म्हणजे आपला चॉकलेट बार चिकटणार नाही. त्यावर सगळं मिश्रण ओतून घ्या. 

५. त्यावरून चमचा फिरवून छान सेट करून घ्या.

६. काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला आवडणारा सुकामेवा त्या मिश्रणावर टाका. तुकडे करून टाका . अख्खा टाकू नका.  

७. तासाभरासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तासाभरात बार तयार होईल. नंतर ताटलीतच सुरीने त्याचे तुकडे पाडा. आणि मग ते वेगळे करून घ्या.

तुमच्या घरातील लहान मुलांना तर प्रचंड आवडेल. नक्की तयार करा. 
 

Web Title: No-oven chocolate bar recipe, no need to cook or steam! Make it quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.