Lokmat Sakhi >Food > साखर आणि मैदा अजिबात न वापरता करा विकतसारखा चोको लाव्हा केक, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ...

साखर आणि मैदा अजिबात न वापरता करा विकतसारखा चोको लाव्हा केक, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ...

No Refined Sugar No Maida Healthy Chocolate Lava Cake : घरच्याघरी मैद्याचा वापर न करता हेल्दी चोको लाव्हा केक करण्याची खास रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 01:33 PM2024-07-26T13:33:26+5:302024-07-26T13:46:37+5:30

No Refined Sugar No Maida Healthy Chocolate Lava Cake : घरच्याघरी मैद्याचा वापर न करता हेल्दी चोको लाव्हा केक करण्याची खास रेसिपी...

No Refined Sugar No Maida Healthy Chocolate Lava Cake Easy choco lava cake without using sugar and flour at all | साखर आणि मैदा अजिबात न वापरता करा विकतसारखा चोको लाव्हा केक, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ...

साखर आणि मैदा अजिबात न वापरता करा विकतसारखा चोको लाव्हा केक, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ...

'केक' म्हटलं की तो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा. त्यातही जर तो चोको लाव्हा केक असेल तर अजून काय हवं... बरेचदा घरातील लहान मुलं केक खायचा म्ह्णून हट्ट धरुन बसतात. अशावेळी आपण त्यांना बाहेरून केक (Choco lava cake recipe) विकत आणून देतो. परंतु दररोज असे बाहेरचे काहीतरी विकतआणून खायला देणे हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. एवढंच नाहीतर मुलं संध्याकाळच्या भुकेच्या वेळी काहीतरी वेगळं खायला हवं म्हणून आरडा - ओरडा करतात. अशावेळी रोज नवीन काय बनवावं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो(Choco lava cake recipe without Maida, No Butter, Refined Sugar). 

प्रत्येकवेळी मुलं हट्ट करतात म्हणून त्यांना बाहरेचा विकतचा केक आणून देणं योग्य नाही. अशावेळी आपण घरच्या घरी झटपट होणारे मिनी चोको लाव्हा केक बनवू शकतो. हाच चोको लाव्हा केक जर आपण बाहेरुन विकत आणायचा म्हटलं तर खूप महाग मिळतो. विकतच्या चोको लाव्हा केकमध्ये भरपूर प्रमाणात साखर, चॉकलेट, मैदा घातलेले असते. त्यामुळे मुलांना असे पदार्थ देणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वाईटच ठरु शकते. अशावेळी आपण घरच्या घरी मैदा, साखर यांचा वापर न करताच मुलांसाठी हेल्दी चोको लाव्हा (Choco Lava Cake - No Maida, No Butter, Refined Sugar-Free Easy Chocolate Lava Cake Recipe) केक बनवू शकतो. आपण घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट ही रेसिपी करु शकतो. चॉकलेट फ्लेवर केकच्या पोटातीलवितळलेले ते चॉकलेट खाणे यासारखी दुसरी मजा नाही. यासाठीच घरच्या घरी मुलांसाठी विकतसारखा चोको लाव्हा केक तयार करणे आता झाले सोपे. त्याचीच ही खास रेसिपी(Easy choco lava cake without using sugar and flour at all).

साहित्य :- 

१. केळं - १ (पिकलेलं केळं)
२. ओटस - १ कप 
३. कोको पावडर - १ कप 
४. मॅपल सिरप - १/२ कप 
५. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून 
६. मीठ - गरजेनुसार 
७. दूध - २ कप 

पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती...


मसाला एक भाज्या अनेक ! फक्त ३ पदार्थ वापरुन करा मल्टीपर्पज मसाला, ग्रेव्ही होईल चविष्ट... 

कृती :- 

१. एका मिक्सरच्या भांड्यात एक पिकलेल केळ घेऊन त्याचे लहान तुकडे करून घ्यावेत. 
२. त्यानंतर त्यात ओटस, कोको पावडर, मॅपल सिरप, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ व दूध घालावे. 
३. आता हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित ब्लेंड करुन त्याचे छान स्मूद असे बॅटर तयार करुन घ्यावे. 

४. त्यानंतर हे बॅटर छोट्या छोट्या बाऊलमध्ये भरुन घ्यावे. 
५. बाऊलमध्ये काढून घेतलेल्या बॅटरवर किसलेले चॉकलेट घालावे. 
६. आता हे बाऊल मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हाय टेम्परेचरला २ मिनिटे ठेवून आपला केक तयार करुन घ्यावा. 

झटपट घरच्या घरी अगदी कमी साहित्यात होणारा चोको लाव्हा केक खाण्यासाठी तयार आहे. अशाप्रकारे आपण साखर, मैदा, बटरचा वापर न करता देखील तितकाच टेस्टी आणि हेल्दी चोको लाव्हा केक तयार करु शकता.

Web Title: No Refined Sugar No Maida Healthy Chocolate Lava Cake Easy choco lava cake without using sugar and flour at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.