Join us  

ना बेकिंग सोडा - ना तांदुळाचं पीठ, कपभर बेसनाची करा कमी तेल पिणारी - कुरकुरीत हॉटेलस्टाईल भजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2024 4:37 PM

No Rice Flour | No Baking Soda | Quick n Easy Potato Bhaji Recipe : बटाट्याची भजी हॉटेलप्रमाणे कुरकुरीत होण्यासाठी बघा काय करायचं?

पावसाळ्यात सायंकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते (Potato Bhaji). बाहेर धो धो कोसळणारा पाउस, घरात चहासोबत भजी खाण्याची इच्छा होतेच (Food). भजीचे अनेक प्रकार आहेत. कांदा, बटाटा, हिरव्या मिरचीची भजी आपण खाल्लीच असेल. पण घरात तयार केल्यास भाजी मनासारखी तयार होत नाही (Monsoon Recipe).

भजी तेलकट आणि कुरकुरीत होत नसल्यामुळे खाण्याची इच्छा होत नाही. अनेकांना बटाट्याची भजी खायला आवडते. पण बटाट्याची भजी फार तेल पितात. शिवाय घरात हॉटेलस्टाईल बटाट्याची भजी तयार होत नाही. जर आपल्याला हॉटेलस्टाईल बटाट्याची भजी करायची असेल तर ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा(No Rice Flour | No Baking Soda | Quick n Easy Potato Bhaji Recipe).

बटाट्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

बेसन

मीठ

भात गिचका, पुऱ्या तेलकट; चपात्या फुलत नाही? १० सोप्या किचन टिप्स; चवदार होईल स्वयंपाक

हळद

ओवा

कोथिंबीर

कृती

सर्वात आधी बटाट्याची साल काढून घ्या, त्याच्या पातळ चकत्या करा. एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात बटाट्याच्या चकत्या घालून धुवून घ्या. एका बाऊलमध्ये एक कप बेसन, चवीनुसार मीठ, हळद, ओवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चमच्याने मिक्स करा. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. बॅटर हातानेच मिक्स करा. जेणेकरून तळताना भजी छान फुलतील.

रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी

बॅटर तयार झाल्यानंतर त्यात एक चमचा गरम तेल घालून मिक्स करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. बॅटर बटाट्याच्या चकत्या घालून मिक्स करा. नंतर गरम तेलात सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. जेणेकरून भजी जास्त तेल पिणार नाही. अशा प्रकारे कुरकुरीत बटाट्याची भजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स