Join us  

ऐन तारुण्यात हाडं ठणठणकतात? रोज खा १ पौष्टिक लाडू; गुडघेदुखी विसराल - केसही होतील दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2024 3:57 PM

No Sugar Healthy Ladoo Recipes - Protein & Nutrient Rich | Healthy Weight Loss Laddu Recipes : हाडांसाठी हा लाडू ठरतो फायदेशीर; केस आणि त्वचा दिसेल तुकतुकीत

प्रोटीन हे एक मायक्रोन्‍यूट्रिएंट आहे (Protien). ज्याची लहान मुलांपासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला गरज असते (Protien Laddoo). प्रथिने केवळ स्नायूंसाठी आवश्यक नसून केस, डोळे आणि आपल्या हार्मोन्सच्या कार्यासाठी देखील आवश्यक मानले जाते (Healthy Food). दररोज व्यायाम करणाऱ्या लोकांना प्रोटीनची सर्वाधिक गरज असते. शरीरातील प्रोटीनची गरज भागवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे पावडर मिळतात. पण याचा खर्च भरपूर असते.

प्रोटीन पावडर घेण्यापेक्षा आपण घरातच प्रोटीनचे पौष्टिक लाडू तयार करू शकता. एका प्रोटीन बॉलमध्ये ११ ग्रॅम प्रोटीन असते. यासाठी आपल्याला विशेष पावडरची गरज नाही. पण प्रोटीन लाडू नक्की तयार करायचे? यामुळे शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे मिळतील?(No Sugar Healthy Ladoo Recipes - Protein & Nutrient Rich | Healthy Weight Loss Laddu Recipes).

प्रोटीन रिच लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

मध

पिनट बटर

व्हॅनिला एॅक्सट्रॅक्ट

पार्लरला जायला वेळच नाही? १० रुपयात फेशिअल करा घरीच; गणेश उत्सवात दिसाल मोहक

प्रोटीन पाउडर

ओट्स

चॉकलेट चिप्स

कृती

प्रोटीन लाडू करण्यासाठी एका बाउलमध्ये ओट्स घ्या. त्यात मध, पिनट बटर, व्हॅनिला एॅक्सट्रॅक्ट आणि प्रोटीन पावडर घालून साहित्य एकजीव करा. नंतर हातावर थोडे मिश्रण घ्या, आणि लाडू वळवून घ्या. लाडू वळवून घेताना आपण त्यात  चॉकलेट चिप्स देखील मिक्स करू शकता. यामुळे लाडूची आणखीन चव वाढेल. आपण आपल्या आवडीनुसार त्यात ड्रायफ्रूटस किंवा किसलेलं खोबरं घालू शकता.

हा लाडू प्रोटीनचा उत्तम सोर्स

मोड आलेल्या कडधान्यांचा कुबट वास येतो? ५ टिप्स; कडधान्य राहतील फ्रेश - मोडही येतील सुरेख

हा लाडू प्रोटीनचा उत्तम सोर्स मानले जाते. यात पीनट बटर, ओट्स आणि प्रोटीन पावडरचा वापर केला आहे. हे तीनही घटक प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. अर्धा कप पीनट बटरमध्ये सुमारे ७ ग्रॅम प्रोटीन असते. अर्धा कप प्रोटीन पावडरमध्ये सुमारे १५ ग्रॅम प्रथिने असते. ३/४ कप ओट्समध्ये सुमारे  ७ ग्रॅम प्रथिने असते. ज्याचा फायदा आरोग्याला होतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स