Lokmat Sakhi >Food > ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe : कमी वयात कंबर, हात-पाय पकडून चालत असाल तर, आतापासूनचं रोज एक पौष्टीक लाडू खायला सुरुवात करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2023 03:21 PM2023-12-03T15:21:44+5:302023-12-03T15:22:33+5:30

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe : कमी वयात कंबर, हात-पाय पकडून चालत असाल तर, आतापासूनचं रोज एक पौष्टीक लाडू खायला सुरुवात करा..

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe | ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

थंडीच्या दिवसात शरीराला उर्जा मिळावी यासाठी योग्य आहाराचे सेवन करायला हवे. शिवाय शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी गरम पदार्थ खाण्याची आवश्यकता असते. ज्यामुळे हिवाळ्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या निगडीत तक्रारी दूर होतात. हिवाळ्यात अनेक घरांमध्ये विविध प्रकारच्या लाडू (Dry fruits Laddu) तयार केले जातात. मेथी, डिंक, ड्रायफ्रुट्स, अळीव, शिवाय खोबरं आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू आवर्जून केले जातात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, जस्त आणि उच्च चरबीसह खनिजे आढळतात. यामुळे सांधेदूखी, गुडघेदूखीच्या त्रासामुळे आराम मिळतो (Cooking Tips).

मात्र, अक्रोड, काजू, बदाम, खजूर खाताना लहान मुलं नाकं मुरडतात (Healthy Laddu). जर घरातील सदस्य ड्रायफ्रुट्स खाताना नाकं मुरडत असतील तर, त्यांच्यासाठी खास ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार करा(No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe).

हिवाळी स्पेशल ड्रायफ्रुट्सचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

अक्रोड

काजू

बदाम

क्रॅनबेरी

५-६ हिरव्या मिरच्या, मुठभर शेंगदाणे, तव्यावर करून पाहा अस्सल झणझणीत चवीचा कोल्हापुरी खर्डा, वाढेल जिभेची चव

खजूर

कोको पावडर

कृती

सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक कप अक्रोड, बदाम, काजू घालून भाजून घ्या. ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स, क्रॅनबेरी, बिया काढलेले खजूर आणि एक चमचा कोको पावडर घालून साहित्य एकत्र वाटून घ्या.

एक कप चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना

तयार वाटलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर हातात थोडे मिश्रण घेऊन लाडू वळवून घ्या. हवावंद डब्यात स्टोर करून ठेवल्यास लाडू महिनाभर टिकतील. अशा प्रकारे हिवाळी स्पेशल पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.