सकाळच्यावेळेस नाश्ता करण्यासाठी प्रत्येकाला वेळ असतोच असं नाही. अशावेळी लाडू, पौष्टीक चिवडा यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. (How To Make Ragi Laddu) अनेकांना डायबिटीस असतो तर काहीजण वजन वाढण्याच्या भितीने साखर खात नाहीत अशावेळी तुम्ही साखर, गूळ न वापरता नाचणीचे पौष्टीक लाडू बनवू शकता. हे लाडू करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत लागणार नाही अगदी कमीत कमी वेळात तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता. (How To Make Ragi Ladoo) या लाडूंमध्ये तुम्ही आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रुट्सस किंवा भोपळ्याच्या बीया, मिक्स बीयाद्धा घालू शकता. (Super Healthy Ragi Ladoo Recipe)
नाचणीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर्स, प्रोटीन असते ज्यामुळे तब्येतीसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात. गर्भवीत महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हा उत्तम पर्याय आहे. नाचणीचाी खिचडी, भाकरी, लाडू किंवा पेज बनवूनही तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता. (Ragi Laddu)
साखर, गूळ न घालताना नाचणीचे लाडू कसे करावेत? (No Sugar No Jaggery Ragi Ladoo Recipe)
1) सगळ्यात आधी एका कढईत नाचणी भाजून घ्या. नाचणी भाजायला ८ ते १० मिनिटं लागतील. नाचणी भाजताना सतत चाळत राहा. नाचणी चाळल्यानंतर एका ताटात काढून घ्या.
ओपन पोर्समुळे चेहरा वयस्कर दिसतो? किचनमधला 'हा' पदार्थ लावा, डाग-पिंपल्स २ मिनिटांत दूर
2) मिक्सरच्या भांड्यात मीठ आणि नाचणी घालून नाचणी बारीक करून घ्या. त्यात २ वाटी साजूक तूप घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. १० ते १२ मिनिटं तूप आणि नाचणी व्यवस्थित भाजून घ्या. याचा सुवास संपूर्ण घरात दरवळेल.
3) नाचणीचं पीठ एका भांड्यात काढून कढईत बीया काढलेले खजूर व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून घ्या. एका ताटाला तूप लावून त्यात खजूर, भाजलेले ड्रायफ्रट्स काढून घ्या.
केस धुताना खूप तुटतात? जावेद हबीबची केस धुण्याची खास पद्धत पाहा, शॅम्पू न लावता होतील दाट केस
4) त्यात नाचणीचे पीठ घाला. हे सर्व साहित्य मिक्सरला लावून बारीक करून घ्या. बारीक केलेलं मिश्रण एका ताटात काढून या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू करून घ्या. तयार आहेत. पौष्टीक नाचणीचे लाडू.