Join us  

कांदा चिरायला वेळ नाही, कांद्याची पावडर वापरा! कांदा पावडर करण्याची आणि स्वयंपाकात वापरण्याची पाहा योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 12:38 PM

Homemade Onion Powder Recipe : Make Your Own Onion Powder At Home : कांदा नाहीतर कांद्याची पावडर वापरून आपण झटपट स्वयंपाक करू शकतो.

कांदा म्हटलं की, या पदार्थाशिवाय आपले जेवणचं तयार होणार नाही. कोणताही पदार्थ करायचा म्हटल की कांदा हा लागतोच. डाळ, भाजी हे पदार्थ कांद्याशिवाय बनवणे शक्यच नाही. आपल्या रोजच्या जेवणात आपण कांदा आवर्जून वापरतो. रोजच्या जेवणात लागणारा कांदा आपल्याला दररोज त्याची साल काढून तो धुवून, कापून मगच भाजीत किंवा डाळीत घालता येतो. कांद्याशिवाय जेवणाला हवी तशी चव येणार नाही पण दररोज कांदा धुवून, चिरून  वापरण्याची प्रक्रिया पण तितकीच वेळ खाऊ आहे. याशिवाय कधी कामाच्या गडबडीत पटकन स्वयंपाक आवरायचा असल्यासं कांदा चिरून घालण्या इतकाही वेळ नसतो. अशावेळी काय करावे हा प्रश्न आपल्याला पडतो. अशा परिस्थितीत कांदा नाहीतर कांद्याची पावडर वापरून आपण झटपट स्वयंपाक करू शकतो. 

दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कांद्याचा स्वयंपाक, कोशिंबीर अथवा वेगवेगळ्या स्वरुपात उपयोग करत असतो. अनेक पदार्थांवर बारीक कांदा चिरून वरुन घालून खातात. अगदी अनेकांना कांद्याची कोशिंबीर खूप आवडते. जवळजवळ सगळ्या भाज्यांमध्ये आपण कांदा चिरून तरी घालतो किंवा तो वाटून त्याचा मसाल्यात, ग्रेव्हीसाठी वापर करतो. अशा फार क्वचित पाककृती असतील ज्यामध्ये कांद्याचा वापर केला जात नाही. काही जण जेवतानाही कच्चा कांदा खातात. कांद्यामध्ये असे कित्येक औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. कांद्यामध्ये फॉलेट, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी इत्यादी पोषण तत्त्वांचा समावेश असतो(Homemade Onion Powder Recipe : Make Your Own Onion Powder At Home).

masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम पेजवरून आपण कांद्याची पावडर बनवून स्वयंपाकात कशी  वापरू शकतो याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  

कांद्याची पावडर कशी बनवावी... 

१. कांद्यावरची साल काढून घ्यावी. २. मग या कांदयाला मध्यम आकाराच्या तुकड्यात कापून घ्यावे. ३. त्यानंतर एका डिशमध्ये बटर पेपर घालून घ्या. ४. बटर पेपर घातलेल्या या डिशमध्ये मध्यम आकाराच्या तुकड्यात कापून घेतलेले कांदे व्यवस्थित पसरवून घाला. ५. मग पुढील २ ते ३ दिवस किंवा कांदयातील पाण्याचा अंश निघून जात नाही तोपर्यंत हे कांद्याचे मध्यम आकाराचे काप वाळून घ्या.६. कांद्याचे तुकडे संपूर्ण सुकवून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित पावडर होईपर्यंत बारीक करून घ्या. ७. ही तयार झालेली कांद्याची पावडर एका बारीक जाळीदार चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. ८. पावडर चाळून झाल्यानंतर त्यातील गाळ बाजूला काढून उरलेली पावडर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. 

अशाप्रकारे घरच्या घरी तुमची कांद्याची पावडर तयार होईल.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स