Join us  

न्यू इयर पार्टीसाठी काय बनवायचंय सुचत नाही? तेच तेच स्नॅक्स खाऊन कंटाळलात, ट्राय करा ३ झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 7:48 PM

New Year Special Snacks Recipe न्यू इयर म्हंटलं की नवीन चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. स्नॅक्ससाठी आपण ३ नवीन डिश करून पाहू शकता.

ख्रिसमसनंतर नवीन वर्षाची चाहूल लागते. काही दिवसांवर नवीन वर्ष येऊन ठेपला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण जय्यत तयारी करतोच. घराला सजवण्यापासून ते शॉपिंगपर्यंत प्रत्येक व्यक्ती छोटी मोठी आरास करतोच. मात्र, या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेटपुजा.

उत्तम पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स, कॉकटेल, स्नॅक्स याशिवाय पार्टीला रंगत नाही. जर आपल्याला पार्टीची आणखी रंगत वाढवायची असेल तर काही नवीन पदार्थ करून पाहा. घरच्या सदस्यांपासून ते मित्र मंडळींपर्यंत प्रत्येकाला हे पदार्थ आवडतील.

स्टफ्ड पनीर मशरूम

पार्टीची रंगत वाढवण्यासाठी आपण स्टफ्ड पनीर मशरूम  बनवू शकता. पांढर्‍या मोठ्या मशरूममध्ये किसलेले पनीर भरून आपण चवदार स्नॅक्स बनवू शकता. ही रेसिपी झटपट बनते आणि चवीलाही उत्तम लागते.

राजमा कबाब

राजमाची भाजी प्रत्येकाला आवडते. त्याचे लज्जतदार कबाब चवीला उत्कृष्ट लागतात. राजमाला उकळून चांगले मॅश करून उकडलेल्या बटाट्यांसोबत गोल आकार देऊन कबाब बनवू शकता. यामध्ये विविध मसाले, कांदा आणि ब्रेड क्रम्ब्स देखील वापरू शकता.

पनीर पॉकेट

उत्तम स्नॅक्स म्हणून आपण पनीर पॉकेटची निवड करू शकता. चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वापरून आपल्याला पनीर पॉकेट बनवता येईल. झटपट बनणारी ही रेसिपी प्रत्येकाला आवडेल.

टॅग्स :नववर्षअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स