दही वडा हा स्ट्रीट फूड, उत्तर भारतात प्रचंड फेमस आहे. हा पदार्थ महाराष्ट्रात देखील तितकाच आवडीने खाल्ला जातो. होळी या सणानिमित्त अनेकांकडे चाटमध्ये दही वडा आवर्जून बनवला जातो. दही वडा ही रेसिपी वड्याला तळून, आंबट - गोड दही, व विविध मसाले आणि चटणीपासून बनवण्यात येतो.
मात्र, काही फिटनेस फ्रिक लोकं हा पदार्थ खाण्यास टाळाटाळ करतात. आपल्याला जर ऑयली वडे खायचे नसेल तर, आपण हा पदार्थ तेलाचा वापर न करता देखील बनवू शकता. या रेसिपीमध्ये विविध डाळींचा समावेश आहे. ज्यामुळे शरीराला पौष्टीक घटक मिळतात. ही हेल्दी रेसिपी कमी साहित्यात झटपट बनते. चला तर मग या पौष्टीक पदार्थाची कृती पाहूयात(Delicious no oil dahi-vada! Easy recipe).
नो ऑइल दही वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
मुग डाळ
उडीद डाळ
चवीनुसार मीठ
पाणी
दही
हिरवी चटणी
खजूर - चिंचेची चटणी
चाट मसाला
जिरं पावडर
बुंदी
डाळिंबाचे दाणे
उलटा वडा पाव? हा कोणता नवीन पदार्थ, पाहा रेसिपी आणि बघा आवडतो का तुम्हाला हा पदार्थ..
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये अर्धा कप मुग डाळ, अर्धा कप उडीद डाळ मिक्स करून भिजत ठेवा. डाळी भिजल्यानंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्या. आता हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा. आता इलेक्ट्रिक व्हिस्कने मिश्रणाला फेटून घ्या.
एकीकडे इडलीच्या भांड्यात पाणी ठेवून भांडं गरम करत ठेवा. तयार मिश्रण इडली पात्रात घाला, ज्याप्रमाणे इडली वाफवण्यासाठी ठेवता, त्याचलप्रमाणे इडली तयार करून घ्या. १२ ते १३ मिनिटाने इडली चांगले तयार होतील. आता तयार वडे एका प्लेटमध्ये काढून घ्या.
होळी स्पेशल : रंग खेळून झाले की प्या गारेगार ‘बदाम थंडाई’, साजरी करा यादगार होळी!
एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात तयार वडे १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. वडे पाण्यात भिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावरून फेटलेले दही, हिरवी चटणी, खजूर - चिंचेची चटणी, चाट मसाला, जिरं पावडर, बुंदी, डाळींबाचे दाणे, घालून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे नो ऑइल दही वडा खाण्यासाठी रेडी.