आपल्याला गार पदार्थ खायला फार आवडतात. मात्र गार पदार्थांमध्ये भरपूर साखर असते. असे काही मोजकेच गार पदार्थ असतील ज्यांमध्ये साखर नसेल. (Now eating ice cream will be healthy, don't you believe it? Then check out this recipe)उन्हाळा असो पावसाळा असो वा हिवाळा असो आईस्क्रीम हा प्रकार सगळ्याच ऋतूंमध्ये खाल्ला जातो. आईस्क्रीम फार लोकप्रिय असा पदार्थ आहे. पण प्रचंड अनहेल्दीसुद्धा आहे. एका आईस्क्रीमच्या कोनमुळे चार दिवसाचे जीम वाया जाऊ शकते. एवढे फॅट्स व कॅलरीज त्यामध्ये असतात. (Now eating ice cream will be healthy, don't you believe it? Then check out this recipe)लहान मुलांना तर आईस्क्रीम प्रचंड आवडते. गार, गोड, मऊ असे आईस्क्रीम दिसले तरी तोंडाला पाणी सुटते. त्यात जर चॉकलेट आईस्क्रीम असेल तर मग बघायलाच नको. एक काय दोन ते तीन स्कुपही कमीच पडतील.
जर तुम्ही या पद्धतीने आईस्क्रीम तयार केलेत तर, ते मनसोक्त खाऊ शकता. (Now eating ice cream will be healthy, don't you believe it? Then check out this recipe)तसेच लहान मुलांनाही बिंधास्त खाऊ द्या. कारण ही रेसिपी हेल्दी आईस्क्रीमची आहे. चवीला अगदी मस्त लागते. जिभेवर विरघळेल असे मऊ, नरम आणि गोड हे आईस्क्रीम उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खायलाच हवे.
साहित्य
मखाणा, खजूर, काजू, बदाम, कोको पावडर, दूध, ओट्स
कृती
१. एका भांड्यामध्ये काजू घ्या. १५ ते २० काजू वापरा. त्यामध्ये बदाम अॅड करा. बदामही १५ ते २० वापरा. तुम्हाला जर इतर सुकामेवा वापरायचा असेल तर तोही वापरा. मात्र बेससाठी आपल्याला काजू बदाम वापरायचे आहेत.
२. त्यामध्ये मखाणा घाला. काजू बदामापेक्षा जास्त मखाणा वापरा. त्यामध्ये अर्धी वाटी ओट्स घाला. शेवटी त्यामध्ये खजूर घाला. ५ ते ६ खजूर पुरेसे असतात. तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर त्यानुसार खजूर वापरा.
३. सगळे पदार्थ मिक्स केल्यावर त्यामध्ये दूध घाला. पदार्थ बुडतील एवढेच दूध वापरा. १५ ते २० मिनिटे तसेच झाकून ठेवा. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. त्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घाला आणि छान पेस्ट तयार करून घ्या. अति पातळ करू नका.
४. एका डब्यामध्ये ती पेस्ट काढून घ्या. वरतून सुकामेवा टाका आणि छान सेट करून झाल्यावर झाकण लावा. डबा फ्रीजमध्ये ठेवा. सुमारे ८ तासांनी आईस्क्रीम तयार होईल. मस्त मऊ आणि गारेगार आईस्क्रीमचा आस्वाद घ्या.