रात्रीच्या जेवणाला काय बनवू? हा प्रश्न प्रत्येक महिला आपल्या घरातील सदस्यांना विचारते. कारण घरातील सदस्यांची आवड ही वेगवेगळी असते. त्यात महिलेला काय बनवावे हा प्रश्न पडणे साहजिक आहे. दररोज चपाती भाजी भात खाऊन घरच्यांना कंटाळा येतो. आज आपल्याला काहीतरी हटके खाण्याची इच्छा होत असेल तर, हॉटेल स्टाईल मलाई प्याज ही रेसिपी ट्राय करून पाहा.
मलाई प्याज ही रेसिपी छोट्या - छोट्या कांद्यापासून बनवले जाते. त्याला मसाला आणि मलाईचा तडका दिला जातो. ही क्रिमी रेसिपी घरातील बच्चे कंपनीसह थोरा मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. या रेसिपीला लागणारं साहित्य फार कमी आहे. कमी वेळात बनणारी ही रेसिपी बनवायला देखील सोपी आहे. चला तर मग या रेसिपीची कृती पाहूयात.
मलाई प्याज बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१ चमचा तूप
१ टीस्पून जिरे
१ तमालपत्र
वेलची
बारीक चिरलेला कांदा
छोटे ७ - ८ कांदे
मीठ
२ टीस्पून काश्मिरी लाल मिर्च पावडर
2 टीस्पून धणे पावडर
हळद
पाणी
२ टोमॅटो, प्युरी
१/४ कप फ्रेश क्रीम + १/४ कप दूध (मिश्र)
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून कसुरी मेथी
गरम मसाला
कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात छोटे - छोटे कांदे सोलून ठेवा. त्यात थोडे तेल आणि मीठ टाकून एअर फ्राय करून घ्या. जर आपल्याकडे एअर फ्राय नसेल तर, कांद्यांना तेलात तळून घ्या. दुसरीकडे एका कढईत तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात सगळे खडे मसाले टाका. मसाले टाकल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा. मीठ, आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकून संपूर्ण मिश्रण तुपात भाजून घ्या. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात इतर मसाले टाकून मिश्रणात मिक्स करा.
मसाल्यांचा सुवास दरवळल्यानंतर त्यात थोडे पाणी टाका. मिश्रण मिक्स करा व त्यात टॉमेट्याची प्युरी टाका. हे मिश्रण चांगले मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटे झाल्यानंतर त्यात मलाई म्हणजेच फ्रेश क्रीम मिक्स करा. आता पुन्हा झाकण ठेवा. आणि २ मिनिटे मिश्रणाला वाफ द्या. वाफ दिल्यानंतर त्यात तळेलेले कांदे टाका. आणि मिश्रण मिक्स करा. आता त्यावर थोडे फ्रेश क्रीम, कसुरी मेथी, धणे पूड, आणि कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करा. अशा प्रकारे मलाई प्याज खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी रोटी, नान अथवा भातासह खाऊ शकता.