बाजारात आंब्यापासून केलेली अनेक कोल्ड्रींक्स मिळतात. त्यामध्ये फक्त आंबा नसतो इतरही रसायने वापरलेली असतात. (Now make mangola at home in just 10 minutes, it's delicious and very easy to make!)तसेच आंब्याच्या रसापेक्षा साखरेचे प्रमाण जास्त असते. चवीला ते फार छान लागले तरी ते नैसर्गिक नसते. शिवाय ताज्या आंब्यांऐवजी साठवलेल्या रसाचा वापर केला जातो.(Now make mangola at home in just 10 minutes, it's delicious and very easy to make!)
घरी आंब्याचे पन्हे आपण करतोच. जेवणामध्ये आंब्याचा मस्त ताजा रस खातो. तुम्ही घरी कधी मँगोला केला आहे का? करायला अगदीच सोपा आहे. (Now make mangola at home in just 10 minutes, it's delicious and very easy to make!)चव अगदी विकतच्या आंब्याच्या कोल्ड्रींक्ससारखीच लागते. त्याहूनही जास्त चांगली लागते. ही रेसिपी पाहा अगदीच १० मिनिटांचे काम आहे. चवीला अगदी छान लागते.
साहित्य
हापूस आंबा, कैरी, साखर, पाणी, लिंबू
कृती
१. दोन छान ताजे गोड असे आंबे घ्या. दोन पिकलेले आबे घेतल्यावर एक कच्ची कैरी असे प्रमाण ठेवायचे. आंबे छान व्यवस्थित धुऊन घ्या.
२. एक कुकर घ्या त्यामध्ये कैरी आणि पाणी घाला. कुकरमध्ये मस्त कैरी शिजवून घ्या. किमान चार ते पाच शिट्या काढा कैरीला शिजायला जास्त वेळ लागतो.
३. कैरी शिजल्यावर गार करुन घ्या. गार झाल्यावर कैरीची सालं काढून घ्या. अगदी आरामात हाताने काढता येते. बाटही काढून घ्या. बाटेबरोबर कैरी वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
४. आंब्याची सालं काढून घ्या. आंब्याचे लहान तुकडे करा. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते तुकडे घ्या. त्यामध्ये साखर घाला. तुम्हाला जेवढे गोड आवडते तेवढी साखर वापरा. सगळं अगदी व्यवस्थित वाटून घ्या.
५. एका खोलगट मोठ्या पातेल्यावर गाळणी ठेवा. त्यामध्ये कैरीचा गर आणि आंब्याचा गर एकत्र करा. चमच्याच्या मदतीने जोर देत व्यवस्थित गाळून घ्या. चोथा वापरू नका. एकदा गाळणीमध्ये थोडे पाणी टाका आणि सगळा अर्क गाळून घ्या.
६. आता अर्कामध्ये पाणी ओता. एक लिंबू पिळा. तसेच चवीपुरते मीठ घाला. मीठ वापरले नाही तरीही चालेल. त्यामध्ये बर्फ घाला किंवा मग फ्रिजमध्ये ठेवा आणि गार करुन घ्या. मस्त गारेगार प्या.