भारतातील आवडता पदार्थ म्हणजे बटाटा. बटाटा हा पदार्थ प्रत्येक डिशमध्ये फिट होतो. बटाटा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतो. बटाट्यापासून जास्त बनवला जाणारा स्नॅक्स म्हणजे चिप्स. ज्याला आपण वेफर्स देखील म्हणतो. वेफर्स हे बटाटे, केळ अथवा फणसापासून बनवले जाते. परंतू, अधिकतर लोकांना बटाट्याचे वेफर्स प्रचंड आवडतात.
बटाट्याच्या वेफर्समध्ये देखील अनेक फ्लेवर्सचे चिप्स बाजारात मिळतात. आपण घरच्या घरी वेफर्स बनवण्याचा प्रयत्न करतो परंतू, ते बाजारात मिळतात तसे होत नाही. आपल्याला जर घरच्या घरी वेफर्स बनवायचे असेल तर, हा व्हिडिओ पाहून आपण करू शकता. चला तर मग आज आपण मिंट फ्लेवर चिप्स या कुरकुरीत पदार्थाची कृती पाहुयात. ही रेसिपी घरगुती व कमी साहित्यात झटपट बनते. सायंकाळच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी उत्तम ठरेल. आपण मिंट फ्लेवर्सचे हे चिप्स घरी साठवून ठेऊ शकता.
मिंट फ्लेवर चिप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटे
तेल
पुदिना
मीठ
चाट मसाला
साखर
सायट्रिक अॅसिड
कृती
सर्वप्रथम, बटाट्याचे साल काढून घ्या. व त्यांना एका बाउलमध्ये ठेवा. त्यात पाणी टाकून बटाटे चांगले धुवून घ्या. बटाटे धुवून झाल्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये पाणी घ्या. त्यात बटाट्याच्या चकत्या कापून टाका. दुसरीकडे पुदिन्याचे पानं प्लेटमध्ये काढून घ्या. त्यांना २ मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. २ मिनिटांनंतर पुदिन्याच्या प्लेटला बाहेर काढा.
मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यानंतर ते क्रिस्प होतील. त्यांना हाताने क्रश करा. अशा प्रकारे पुदिन्याची पावडर रेडी. मिंट मसाला बनवण्यासाठी एका बाउलमध्ये पुदिन्याची पावडर घ्या, त्यात चाट मसाला, मीठ, साखर आणि सायट्रिक अॅसिड टाकून मिश्रण एकत्र करा. आपण हा मसाला वेफर्सवर वापरणार आहोत.
आता बटाट्याच्या चक्त्यांना पाण्यामधून धुवून काढा. त्यातील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी बटाट्याच्या चक्त्यांना टॉवेलवर काढून ठेवा. त्यावर आणखी एक कापड ठेऊन बटाट्याच्या चक्त्यातील पाणी काढून घ्या. आता एका कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात हे चिप्स तळून घ्या. गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत चिप्स चांगले तळून घ्या. चिप्स तळून झाल्यानंतर त्यांना एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात तयार मिंट मसाला टाका व मिक्स करा. अशाप्रकारे मिंट मसाला वेफर्स खाण्यासाठी रेडी..