फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा यांसारख्या चटपटीत गोष्टींचा सर्वात बेस्ट पार्टनर म्हणजे पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाल्याशिवाय फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा खाणे याची कल्पनाच आपण करु शकत नाही. पेरी पेरी मसाल्यामुळे फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा यांची चव अधिक चांगली होण्यास मदत होते. चटपटीत, चमचमीत पदार्थ खाण्याऱ्यांसाठी पेरी पेरी मसाला खूप उपयोगी पडतो. कुठल्याही पदार्थाची चव बिघडली किंवा एखाद्या चटकदार पदार्थाची चव अजून वाढविण्यासाठी पेरी पेरी मसाला फायदेशीर ठरतो.
आपल्याकडे हल्ली अनेक पदार्थांवर हा मसाला घातला जातो. मस्त तिखट व तितकाच चविष्ट असा हा मसाला एखाद्या साध्या जेवणाचीही रंगत वाढवतो. पेरी पेरी मसाला (Peri Peri Masala) कशावरही थोडासा भुरभुरता आला तर त्या पदार्थांची चव वाढते. असा हा सगळ्या पदार्थात घातला जाणारा पेरी पेरी मसाला विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवू शकतो(How To Make Peri Peri Masala At Home).
साहित्य :-
१. काश्मिरी लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून
२. ओरेगॅनो - १ टेबलस्पून
३. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
४. ड्राय आल्याची पावडर / सुंठ पावडर - १ टेबलस्पून
५. दालचिनी - १ काडी
६. वेलची पूड - १/४ टेबलस्पून
७. सैंधव मीठ - १ टेबलस्पून
८. काळीमिरी पूड - १ टेबलस्पून
९. साखर - १ टेबलस्पून
१०. मीठ - १/२ टेबलस्पून
११. गार्लिक पावडर - १ टेबलस्पून
१२. ड्राय ओनियन पावडर - १ टेबलस्पून
१३. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून
कृती :-
१. एका मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्रित करून ते एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊन त्याची बारीक पूड करून घ्यावी.
२. आता मिक्सरच्या भांड्यात तयार झालेला पेरी पेरी मसाला एका काचेच्या बरणीत भरुन ठेवा.
चीज कॉर्न ओपन सॅन्डविच, नाश्त्याला उत्तम पदार्थ, पौष्टिक व चविष्ट रेसिपी...
आपला पेरी पेरी मसाला खाण्यासाठी तयार आहे. आपल्या आवडीनुसार बर्गर, फ्रेंच फ्राईज, सँडविच यांसारख्या पदार्थांवर आपण हा पेरी पेरी मसाला भुरभुरवून त्या पदार्थांची चव वाढवू शकता.
गार्लिक आणि ड्राय ओनियन पावडर वगळून बाकी तेच जिन्नस वापरुन आपण जैन पेरी पेरी मसाला देखील झटपट घरच्या घरी तयार करु शकता.