Join us

पाणीपुरीची पुरी विकतच आणता? आता घरीच करा.. मस्त टम्म फुगलेली कुरकुरीत पुरी.. पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2025 19:03 IST

Now make puri for panipuri at home.. Delicious, fluffy, crispy puri.. See the recipe : पाणीपुरी करताना आता पुऱ्याही घरीच करा. अगदी सोपी रेसिपी. कमी पैशात भरपुर पुऱ्या.

अनेक पदार्थ असे असतात ज्यांची चटक एकदा लागली की मग पोटभर खाल्ल्याशिवाय पोटाला शांतता आणि मनाला शांती मिळत नाही. असाच एक पदार्थ म्हणजे पाणीपुरी. भैय्या एक और असं म्हणत कधी एकच्या दोन दोनच्या तीन प्लेट खाल्ल्या जातात याचा  अंदाज लागत नाही.(Now make puri for panipuri at home.. Delicious, fluffy, crispy puri.. See the recipe) पाणीपुरीचे पाणी मस्त चविष्ट झाले की मग पाणीपुरी चमचमीत लागते. मात्र जर पुरी चांगली खुसखुशीत नसेल तर मग ती पाणीपुरी खायला मज्जा येत नाही. (Now make puri for panipuri at home.. Delicious, fluffy, crispy puri.. See the recipe)त्यामुळे पुरी छान टम्म फुगलेली असायला हवी. घरी जरी पाणीपुरीचा बेत असला तरी पुऱ्या आपण विकतच आणतो. मात्र घरी छान पुऱ्या करणे अगदीच सोपे आहे. 

साहित्यरवा, कणीक, पाणी, मीठ, तेल

कृती१. एका परतीमध्ये वाटीभर रवा घ्या. वाटीभर रव्यामध्ये अर्धी वाटी कणीक घाला. जेवढा रवा घ्याल त्याच्या अर्धी कणीक घ्यायची. कितीही वाटी रवा घेतला तरी हे प्रमाण लक्षात ठेवा. रवा व कणीक मस्त एकजीव करुन घ्या.

२. पीठामध्ये चवीपुरते मीठ घाला. नंतर हळूहळू थोडे पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. मऊ पीठ मळा जास्त घट्टही नको जास्त पातळही नको. मध्यम पीठ मळा. पुरीसाठी जसे पीठ मळता तसेच पीठ मळा. 

३. पीठ मळून झाल्यावर एका खोलगट भांड्यामध्ये पीठाचा गोळा ठेवा. एक कॉटनचा फडका ओला करुन घ्या. व्यवस्थित पिळा आणि मग पीठावर ठेवा. तासभर पीठ झाकून ठेवा. नंतर पीठाच्या लहान लाट्या पाडून घ्या. त्याला कणीक लावा आणि थोडावेळ झाकून ठेवा.    

४. पोलपाटाचा वापर करून पुरी लाटून घ्या. पीठ लाऊ नका. फक्त लाटी घ्या. लहान पुऱ्या लाटा. जास्त पातळ नका करु थोडी जाडच पुरी लाटा. सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यावर एका सुक्या कॉटनच्या फडक्यावर पुऱ्या ठेवा. वरतून एक ओला कॉटनचा फडका ठेवा. सगळ्या पुऱ्या झाकल्या जातील याची काळजी घ्या. किमान तासभर तरी पुऱ्या ओल्या फडक्या खाली ठेवायच्या.

५. कढईमध्ये तेल घ्या. तेल मस्त गरम झाल्यावर एक एक करुन पुऱ्या त्यामध्ये सोडा मस्त टम्म फुगतील. पुरी पटकन तयार होते. जास्त वेळ लागत नाही पटकन काढा म्हणजे करपणार नाही.    

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स