बाजारांत किंवा भाजीच्या दुकानांत गेल्यावर छोट्या प्लॅस्टिक कंटेनरमध्ये पांढऱ्या रंगाची छत्रीच्या आकारासारखी भाजी दिसते, यालाच आपण 'मशरुम' किंवा 'अळंबी' म्हणतो. मशरूमच्या विविध प्रजाती जगभरात अस्तित्वात आहेत, त्यात असणारे पोषक तत्व हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. मशरुम्सचे हे विविध प्रकार वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी वापरले जातात. पिझ्झा टॉपिंग, सँडविच, मशरूम सूप, मशरूम ग्रील, मशरूमची भाजी असे अनेक पदार्थ आपण मशरूम पासून बनवून खातो. मशरूममध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याकारणाने ते जास्त काळ साठवून ठेवणे अशक्य होते. बाजारातून मशरूम विकत आणल्यानंतर किमान २ ते ३ दिवसांच्या आत ते वापरावेच लागतात. नाहीतर मशरुम खराब होऊन वाया जाण्याची शक्यता जास्त असते. बाजारातून मशरुम्स विकत आणल्यानंतर जर तुम्हांला लगेच ते वापरायचे नसतील तर एका सोप्या पद्धतीने ते स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवू शकता(How To Store Mushrooms For Longer).
काय आहे मशरुम्स टिकवून ठेवण्याची सोपी ट्रिक...
मशरुम्समध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स घटक असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. मशरुम्स पासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कमी कॅलरीज, प्रथिने, लोह, फायबर, खनिजे, जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. अशा या बहुगुणी आणि बहुउपयोगी मशरुम्सचे फायदे अनेक असले तरीही ते जास्त काळ साठवून ठेवू शकत नाही हा त्याचा एक मोठा तोटा आहे. परंतु चिंता करू नका आता एक सहज सोपा पर्याय उपयोगात आणून हे मशरुम्स आपण किमान १ आठवडा तरी फ्रिजमध्ये सहज स्टोअर करून ठेवू शकतो.
मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या इंस्टाग्राम masterchefpankajbhadouria पेजवरून मशरुम्स किमान १ आठवड्यापर्यंत कसे टिकवून ठेवता येतील याबद्दलची माहिती एका व्हिडीओमार्फत शेअर केली आहे. मास्टरशेफ पंकज भदौरिया यांची सोपी ट्रिक वापरून आपण देखील मशरुम्स स्टोअर करून ठेवू शकतो.
मशरुम्स टिकवण्यासाठीचा सोपा उपाय :-
१. एक हवाबंद डबा किंवा कंटेनर घ्यावा. २. या डब्यांत टिश्यू पेपर अंथरून घ्यावा. लक्षात ठेवा संपूर्ण डबा टिश्यू पेपरने व्यवस्थित कव्हर होईल असे बघा. ३. आता टिश्यू पेपर अंथरलेल्या बेसवर मशरुम्स ठेवा. ४. मशरुम्स ठेवल्यानंतर त्यावर देखील टिश्यू पेपर घालून सर्व मशरुम्स टिश्यू पेपरने झाकून घ्यावेत. ५. आता या हवाबंद डब्याचे झाकण व्यवस्थित लावून घ्यावे. ६. मशरुम्स ठेवलेला हवाबंद डबा आता फ्रिजमध्ये ठेवून द्या.
ही सोपी पद्धत वापरून आपण मशरुम्स किमान १ आठवड्यापर्यंत फ्रिजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो.