Lokmat Sakhi >Food > वटपौर्णिमेला वाण म्हणून देतात फणसाचे गरे, फणस म्हणजे सुपरफूड - ५ फायदे तब्येतीसाठी वरदान...

वटपौर्णिमेला वाण म्हणून देतात फणसाचे गरे, फणस म्हणजे सुपरफूड - ५ फायदे तब्येतीसाठी वरदान...

5 Reasons Why the Jackfruit Is Super Healthy : Top 5 health benefits of jackfruit : फणस खायला चवदार तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. पाहा फणस खाण्याचे अनेक फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 02:17 PM2024-06-21T14:17:53+5:302024-06-21T14:35:12+5:30

5 Reasons Why the Jackfruit Is Super Healthy : Top 5 health benefits of jackfruit : फणस खायला चवदार तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. पाहा फणस खाण्याचे अनेक फायदे...

Nutritional and Health Benefits of Jackfruit 5 Incredible Health Benefits of Jackfruit | वटपौर्णिमेला वाण म्हणून देतात फणसाचे गरे, फणस म्हणजे सुपरफूड - ५ फायदे तब्येतीसाठी वरदान...

वटपौर्णिमेला वाण म्हणून देतात फणसाचे गरे, फणस म्हणजे सुपरफूड - ५ फायदे तब्येतीसाठी वरदान...

'बाहेरुन काटेरी, आतून गोड, रसाळ' असं फणसाच वर्णन करता येऊ शकत. उन्हाळ्यात फणस भरपूर प्रमाणात बाजारात विकायला उपलब्ध असतात. फणसाचे गरे खाण्यासोबतच त्याची भाजी आणि इतर पदार्थही बनवले जातात. कोकणचा मेवा म्हणून ओळखला जाणारा फणस खायला सगळ्यांनाच आवडतो. फणस कापायचे काम किचकट व वेळखाऊ असल्याने काहीजण बाजारांतून थेट गरेच विकत आणून खातात. फक्त फणसाचे गरेच नव्हे तर त्याच्या बिया म्हणजे आठळ्या देखील आरोग्यासाठी फायदेशीर असतात(5 Incredible Health Benefits of Jackfruit). 

वटपौर्णिमेनिमित्त स्त्रिया वाण देतात, त्यात फणसाचे गरे हे आवर्जून दिले जातात. फणस फक्त चवीलाच छान लागत नाही तर तो आरोग्यदायी गुणांनी परिपूर्ण असतो. फणसात अनेक पौष्टिक घटकी असतात, जसे की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोहासारखे पोषक घटक असतात. यामध्ये भरपूर फायबर असते, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात कॅलरीज अजिबात नसतात. असा हा बहुगुणी फणस खाल्ल्याने त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. ते फायदे नेमके कोणते पाहूयात(5 Amazing Health Benefits of Eating Jackfruit).

वटपौर्णिमेला वाण म्हणून फणस का देतात ? 

वटपौर्णिमेच्या दिवशी वाण देण्याची देण्याची प्रथा फार जुनी आहे. यादिवशी सुवासिनी एकमेकांना वाण देतात. या वाणात पाच काळ्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळ ही फळं ठेवली जातात. पण आपल्याला प्रश्न पडतो की, वटपौर्णिमेच्या वाणात हिच पाच फळं का ठेवली जातात, तर यामागेही एक कारण आहे. ही पाचही फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शिवाय ही हंगामी फळ आहेत. त्याचप्रमाणे ही फळं वर्षभरातून एकदा याच हंगामात खायला मिळतात. त्यामुळे वाणाच्या निमित्ताने ही फळं खायला मिळतात.

फणस कापण्याचा व्याप मोठा, हात-सुरी चिकट होते? ३ सोप्या टिप्स- फणस खा- कापा-बरंका..

फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते ? 

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी :- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फणस खाणे फायदेशीर ठरते. फणस खाल्ल्याने आपल्या शरीरातील  अँटिऑक्सिडेंट आणि लॅक्टिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. फणसामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे मानले जातात. 

२. वजन कमी करण्यासाठी :- लठ्ठपणा कमी करण्यासाठी फणसाचा आहारात समावेश केला पाहिजे. यामध्ये भरपूर फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते. याचबरोबर फणसात खूप कमी कॅलरीज असतात. फणसातील इतर घटक जसे की, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम देखील वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. 

वटपौर्णिमेला स्पेशल : पूजेला नेसा नऊवारी साडी, पाहा देखणा पारंपरिक लूक करण्याचे सुंदर पर्याय...

३. हाडे मजबूत होतात :- फणसामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर हाडांशी संबंधित आजार जसे की सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिसवरही फणसाच्या सेवनाने नियंत्रण ठेवता येते. हाडे मजबूत करण्यासाठी देखील फणस खाणे उपयुक्त ठरते. यामध्ये आढळणारे पोटॅशियम हाडांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाणही चांगले असते. कॅल्शियम शोषण्यासाठी मॅग्नेशियम महत्त्वाचे मानले जाते आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

४. रक्तदाब नियंत्रित करते :- रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्‍यासाठीही फणस फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. उच्च रक्तदाबाचे कारण असलेल्या सोडियमचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. फणसात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी फणसाचा आहारात समावेश करावा.

५. पचनक्रिया सुधारते :- फणस हे फायबरचे चांगचे स्रोत मानले जाते. हे पचनासाठी महत्त्वाचे असते. फायबर बद्धकोष्ठता दूर करते. हे आतड्यांची चांगली स्वच्छता आणि पाचन तंत्रातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते.

Web Title: Nutritional and Health Benefits of Jackfruit 5 Incredible Health Benefits of Jackfruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.