Lokmat Sakhi >Food > उपवासाच्या दिवशी दिवसभर एनर्जेटिक राहायचं? खा साबुदाण्याची खीर; रेसिपी सोपी- फायदे भारी

उपवासाच्या दिवशी दिवसभर एनर्जेटिक राहायचं? खा साबुदाण्याची खीर; रेसिपी सोपी- फायदे भारी

उपवासाला फराळ म्हणून काय खातो ( fasting meals) यावरही उत्साह आणि ऊर्जा अवलंबून असते. उपवासाच्या दिवशी दिवसभर उत्साह टिकून राहाण्यासाठी साबुदाण्याची खीर (sabudana kheer for energy) खावी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 02:51 PM2022-07-30T14:51:10+5:302022-07-30T15:02:35+5:30

उपवासाला फराळ म्हणून काय खातो ( fasting meals) यावरही उत्साह आणि ऊर्जा अवलंबून असते. उपवासाच्या दिवशी दिवसभर उत्साह टिकून राहाण्यासाठी साबुदाण्याची खीर (sabudana kheer for energy) खावी.

Nutritional benefits form sabudana kheer | उपवासाच्या दिवशी दिवसभर एनर्जेटिक राहायचं? खा साबुदाण्याची खीर; रेसिपी सोपी- फायदे भारी

उपवासाच्या दिवशी दिवसभर एनर्जेटिक राहायचं? खा साबुदाण्याची खीर; रेसिपी सोपी- फायदे भारी

Highlightsसाबुदाण्याची खीर खाण्याचे फायदे या खीरीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकातून मिळतात.साबुदाण्याच्या खीरीमधील साबुदाणा हा उत्साह वर्धक आहार मानला जातो.साबुदाण्याची खीर खाल्ल्यानं शरीराला बल मिळतं.

श्रावणात महिला भरपूर उपास तापास करतात. उपवास करण्याचा उत्साह असला तरी तो दिवसभर टिकून राहात नाही. कारण दिवसभर उपवास करुन शरीरात ऊर्जाच राहात नाही. गळपटल्यासारखं होतं. पण उपवासाला फराळ म्हणून काय खातो (fasting meals)  यावरही उत्साह आणि ऊर्जा अवलंबून असते. उपवासाच्या दिवशी दिवसभर उत्साह टिकून राहाण्यासाठी साबुदाण्याची खीर खावी. ही खीर एरवीपेक्षा उपवासालाच केली जाते. 15-20 मिनिटात होणारी साबुदाण्याची खीर (sabudana kheer for energy)  खाण्यामुळे तरतरी तर येतेच शिवाय इतरही फायदे (benefits of sabudana kheer)  होतात. आहारतज्ज्ञ कामिनी कुमारी यांच्या मते साबुदाण्याची खीर खाल्ल्यानं शरीराला बल मिळतं. ही खीर लहान मुलांच्या तब्येतीसाठीही उपयुक्त असते. 

Image: Google

साबुदाण्याची खीर खाल्ल्यास..

1. साबुदाण्याच्या  एक वाटी खीरीतून शरीराला 200 कॅलरीज मिळतात. यात फॅटस हे 10 असतात. या खीरीतून शरीराला पोटॅशियम, कॅल्शियम आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात मिळत असल्यानं उपवासाला आनंदी आणि उत्साही राहाण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक ताकद मिळवण्यासाठी वाटीभर साबुदाण्याची खीर खाण्याचा सल्ला दिला जातो. 

2. साबुदाणा खीरीमध्ये साबुदाणा, दूध, साखर, तूप आणि वेलची पावडर हे महत्वाचे घटक असतात. साबुदाण्याची खीर खाण्याचे फायदे या खीरीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकातून मिळतात.  साबुदाण्याच्या खीरीत असलेल्या दुधामुळे ही खीर खाऊन कॅल्शियम मिळतं.  हाडांच्या , दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी साबुदाणा खीर फायदेशीर ठरते. या खीरीमध्ये कर्बोदकांचं प्रमाण कमी असल्यानं साबुदाण्याची खीर खाल्ल्यानं रक्तातील साखर वाढत नाही. मात्र साबुदाण्याची खीर अति गोड केल्यास रक्तातील साखर वाढू शकते. 

3. साबुदाण्याच्या खीरीमधील साबुदाणा हा उत्साह वर्धक आहार मानला जातो. साबुदाण्यात कर्बोदकं असतात. साबुदाण्यात कॅलरीजचं प्रमाणही चांगलं असल्यानं उपवासाला साबुदाण्याची खीर खाल्ल्यास दिवसभर उत्साह राहातो.

Image: Google

चविष्ट आणि पौष्टिक साबुदाणा खीर

साबुदाणा खीर करण्यासाठी साबुदाण धुवून तो 15 मिनिटं भिजवावा. दुधामध्ये साखर आणि वेलची पूड घालून दूध उकळून घ्यावं. दूध उकळलं की त्यात भिजवलेला साबुदाणा घालावा. साबुदाणा दुधात एकत्र करुन झाल्यावर त्यात 1 ते दीड कप पाणी घालावं. खीरीतील साबुदाणा फुलेपर्यंत खीर उकळावी. या खीरीमध्ये केशर घातल्यास छान लागतं . त्यासाठी पाव कप गरम दुधात थोडं केशर घालून 10 मिनिटं ठेवावं. खीरीतील साबुदाणा शिजला की केशर घातलेलं दूध खीरीमध्ये घालावं. खीरीमध्ये एक चमचा तूप सोडावं. खीर गरम गरम खाल्ल्यास चवीला मस्त लागते आणि लगेच एनर्जी मिळते. 

Web Title: Nutritional benefits form sabudana kheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.