Anti Ageing Foods : कुणालाही असं वाटतं असतं की, ते कधीच म्हातारे होऊ नये. मात्र, वय वाढणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. जी कुणीही रोखू शकत नाही. मात्र, तुम्ही म्हातारे दिसणं टाळू शकता. डाएटची काळजी घेऊन, एक्सरसाईज करून, पुरेशी झोप घेऊन, भरपूर पाणी पिऊन, जंक आणि प्रोसेस्ड फूड्स टाळून तुम्ही तरूण दिसू शकता. तसेच वाढत्या वयातही तुम्ही एनर्जेटिक राहू शकता.
बऱ्याचं लोकांचं असं मत असतं की, इतकं सगळं कोण करत बसणार, सरळ सरळ जीवन जगावं. मात्र, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतंच. निरोगी शरीर आणि तरूण दिसण्यासाठी तुम्हाला चुकीच्या काही सवयी सोडाव्याच लागतील आणि चांगल्या सवयींसोबत गट्टी करावी लागेल. कारण जसजसं वय वाढतं तेव्हा आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडत असतो.
अशात आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही खास फूड्सची माहिती घेऊन आलो आहोत, जे वाढत्या वयाचा प्रभाव कमी करतात आणि तुम्ही ६० वयातही तरूण दिसू शकता. या फूड्स आयटमबाबत Nutritionist LogaPritika Srinivasan नं माहिती दिली आहे.
डाळिंब
डाळिंब एक बेस्ट अॅंटी-एजिंग फूड आहे. यात व्हिटॅमिन ई, पॉलीफेनॉल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखे तत्व असतात, जे स्कीन एजिंग रोखण्यास मदत करतात.
गाजर
जर तुम्ही नियमितपणे गाजर खाल्ले तर यानं त्वचेला खूप फायदा मिळतो. गाजरामुळे लाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुम्ही म्हातारपणी सुद्धा तरूण दिसाल.
कलिंगड
कलिंगड फळाध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि सोबतच लायकोपीन नावाचं तत्व असतं, जे त्वचेचं वय वाढण्याची प्रक्रिया स्लो करतं. कलिंगड नियमित खाल्ल्यास त्वचा टवटवीत आणि चमकदार दिसते.
पपई
पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर फळ मानलं जातं. यात व्हिटॅमिन ए, सी आणि लायकोपीन असतं. यानं त्वचा चमकदार, टोन्ड आणि तरूण दिसण्यास मदत मिळते.
ब्रोकली
ब्रोकली नियमितपणे खाल तर तुम्ही म्हातारपणातही तरूण दिसू शकता. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि के भरपूर प्रमाणात असतं आणि यात अनेकप्रकारचे अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे वाढत्या वयाची प्रक्रिया स्लो करतात.