Join us

पौष्टिक व चविष्ट कोथिंबीरीचे सूप.. तेलाची गरज नाही, मस्त आंबट-तिखट सूप एकदा कराच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 16:05 IST

Nutritious and delicious coriander soup recipe : कोथिंबीर शरीरासाठी चांगली. तेल न वापरता करा कोथिंबीरीचे सूप.

वजन कमी करायचे असेल तर आहाराकडे लक्ष द्यावे लागते.  कोथिंबीरीचे सूप हा पौष्टिक आहारासाठी अगदीच योग्य असा पदार्थ आहे. ()Nutritious and delicious coriander soup recipe तेलाचा अजिबात वापर न करता हे चविष्ट सूप करता येते. करायला अगदीच सोपे आहे. हॉटेलपेक्षा मस्त घरी करता येते. 

साहित्यकोथिंबीर, लिंबू , लसुण, मीठ, पाणी, कॉर्नफ्लावर, आलं, हिरवी मिरची, काळीमिरी पूड, गाजर, सिमला मिरची, कोबी

कृती१. गाजराची सालं सोलून घ्या आणि गाजर एकदम बारीक चिरुन घ्या. त्यानंतर सिमला मिरचीच्या बिया काढून घ्या आणि मग अगदी बारीक चिरुन घ्या.(Nutritious and delicious coriander soup recipe ) तसेच कोबी किसून घ्या. भाज्या जास्त घ्यायची गरज नाही थोड्याच वापरा. 

२. कोथिंबीर निवडून झाल्यावर काड्या आपण टाकून देतो. या सूपसाठी त्या काड्या वापरा. चवीला कोथिंबीरीची काडी छान लागते. त्यामध्ये पोषणही असते. चांगल्या स्वच्छ धुतलेल्या काड्या वापरा. 

३. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्या. आलं छान किसून घ्या. कोथिंबीरीच्या सूपासाठी भरपूर लसूण वापरायची तिची चव अगदी मस्त लागते. या सुपसाठी लसुण महत्त्वाचा पदार्थ आहे. लसणाच्या पाकळ्या सोलून झाल्यावर लसुण चिरुन घ्या. किंवा मग ठेचून घ्या.

४. एका कढईमध्ये किान दोन वाट्या पाणी घ्या. त्यामध्ये लसुण टाका. तसेच किसलेले आले टाका. हिरव्या मिरचीचे तुकडे टाका. लसणाचा वास सुटला की त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घाला. कोबी घाला. गाजर घाला. सिमला मिरची घाला. सगळ्या भाज्या मस्त उकळून घ्यायच्या. कढईवर झाकण ठेवा आणि भाज्या छान शिजू द्या. 

५. मिक्सरमधून कोथिंबीरीच्या काड्या व कोथिंबीर वाटून घ्या. वाटण गाळून घ्या. चोथा काढून टाका. उकळत ठेवलेल्या पाण्यामध्ये कोथिंबीरीचे पाणी ओता. व्यवस्थित ढवळून घ्या. पुन्हा झाकण ठेवा व सूप उकळू द्या.

६. एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्या. त्यामध्ये दोन चमचे पाणी घाला. मस्त पेस्ट करुन घ्या. सुपमध्ये ती पेस्ट घाला. थोड्याच वेळात सूप जरा घट्ट होईल. काळीमिरी पूड घाला.  मग त्यामध्ये एक अख्खे लिंबू पिळा. चवीनुसार मीठ घाला. सूप छान एकजीव झाल्यावर गॅस बंद करा. गरमागरम प्या.          

टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजना