शुभा प्रभू साटम
कितीही मोजून मापून केलं तरी कधीतरी अन्न उरतंच. त्यातही रात्री भात उरणं हे तर नेहमीचंच. कोंड्याचा मांडा करुन खाण्याची आपली रीत, महागडं अन्न टाकून देण्याची फेकझोक शक्यच नाही. मात्र अनेकदा त्या पदार्थांचे काय नवे करून त्याला सदगती द्यायची हे कळतं नाही. बरं नेहमीचं काय करावे तर घरातली मुलं नाक मुरडतात. पुन्हा पदार्थ असा नको की उरलं ते वापरुन भलतंच जास्तीचं काही व्हावं, त्यात करायला अवघड. पदार्थ असा हवा की करायला सोपा, झटपट, साहित्य कमी. आता एवढ्या अटी म्हंटल्यावर कळत नाही की सुचत नाही नेमकं करायचं काय? म्हणूनच आज जी कृती मी देतेय ती अशीच एक क्लुप्ती आहे,उरलेल्या अन्नाचा अधिक उत्तम पुर्न:वापर. चविष्ट. या पदार्थाची व्याप्ती मोठीय, त्यात दोन बेसिक घटक हवेतच. बाकी व्हॅल्यू अडीशन म्हणून तुम्ही काहीही घालू शकता.
(Image : Google)
साहित्य
उरलेला भात आणि ओट्स, यात आता खालील पदार्थ कितीही कसेही घाला,बटाटा उकडून आणि कुस्करून,कोबी/गाजर किसून,मटर उकडून थोडे चेचून, पालक बारीक चिरून,पनीर किसून, थोडे बेसन, लाल तिखट, धने जिरे मिरी पूडतिखट हवं तर आले लसूण मिरची कोथिंबीर वाटून. लिंबू रस.
(Image : Google)
कृतीओट्स किंचित शेकवून त्याची कोरडी भरड करून घ्या.भात ओट्स बेसन बटाटा आणि जे साहित्य घालणार ते सर्व परातीत घेऊन व्यवस्थित एकजीव करून घ्या.आता याचे चपटे गोळे करून रव्यात घोळवून तव्यावर लालसर होईतो शेकून घ्या.खमंग पॅटीस तयार..कशाचे केले, उरलेल्या शिळ्या भाताचे केले असं काही घरी सांगू नका. ते आपलं सिक्रेट.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)