अरे बापरे!! आज पुन्हा भाजीत मीठ जास्त पडलं? मग आता काय करणार? नेहमी प्रमाणे वरून अजून पाणी घालणार. मग भाजी पातळ होऊन जाते. तुमच्या बरोबर पण असं होतं ना? घाई गडबडीत कधीतरी चमचा भर मीठ जास्त पडायचंच. पण खारट भाजी खाताना घरच्यांचे टोपणे भाजी पेक्षाही खारट लागतात. (Oh dear!! curry got salty?..no tension easy solution..)कधीतरी एकाहून जास्त जणं स्वयंपाकघरात काम करत असतात. आणि सगळेच थोडं थोडं मीठ त्या भाजीत घालतात. मग तर भाजी खाऊच शकत नाही एकढी खारट होते. जर भाजी सुखी असेल, तर पाणीही घालू शकत नाही. मग एकतर सगळ्यांनी खारट भाजी गोड मानून घ्यायची. (Oh dear!! curry got salty?..no tension easy solution..)किंवा चक्क फेकून द्यायची. नाही ओ!! जीवावर येतं अन्न वाया घालवायला. आणि अन्न वाया घालवून नयेच मुळी. तर मग अशावेळी काय करु शकतो? तीन मस्त आणि सोपे उपाय आहेत. ज्यांमुळे मीठाचे प्रमाण भाजीतून कमी करता येते.
उपाय १.(Oh dear!! curry got salty?..no tension easy solution..)
जर मस्त पातळ भाजी केली आहेत. मीठ जास्त झालंय? तर पाणी वाढवू नका. भाजी खारट नाही लागली तरी पांचट लागते. आणि बेचवही लागते. त्याऐवजी थोडी कणिक घ्या. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. पोळ्या तयार करायला आपण जे वापरतो ना तेच. पीठ मळून घ्या. त्या पीठाचे छोटे छोटे गोळे करा. ते गोळे भाजीत पसरवा. थोड्यावेळाने ते गोळे काढून टाका. भाजीतलं जास्तीचं मीठ कणकेचे गोळे ओढून घेतात.
हे झाले रस भाजीचे. सुख्या भाजीत जर मीठ जास्त झालं तर?
उपाय २.
सुख्या भाजीत जर मीठ जास्त झाले असेल तर त्यात लिंबू पिळा. लिंबाचा रस खारटपणा कमी करतो. लिंबू अति पिळू नका. नाहीतर खारटपणा कमी होईल, आणि आंबटपणा जास्त होईल.
आमटीसारख्या पदार्थांतून मीठ कमी करायचे असेल तर?
उपाय ३.
आमटीत मीठ जास्त झाले असेल तर सोपा उपाय आहे. बटाट्याला काट्याच्या चमच्याने भोक पाडा. त्याच चमच्यात बटाटा अडकवा. आमटीत किमान एक मिनिट गोल फिरवा. आणि बटाटा काढून टाका. आमटी गरम असतानाच करा तर उपयोग होईल.