मंजिरी कुलकर्णी
तेल कुठलेही खा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं प्रमाण. तेलाचं प्रमाण हे ४०० मिली लिटर प्रति व्यक्ती प्रति महिना असावं. त्याच्या आसपास जरी तुम्ही आलात तरी पुरेसे आहे. कारण भारतीय आहारात तेलाचा सढळ हाताने होणारा वापर, कार्बोदकांचे अतिरिक्त प्रमाण आणि प्रोटीनची कमतरता आणि शून्य व्यायाम हेच सगळ्या आजाराचं प्रमुख कारण आहे.
कोणते तेल खावे?
तर सगळ्या तेलाचे गुणधर्म वेगवेगळे असतात, त्यांचा उष्मांक वेगवेगळा असतो त्यामुळे मध्ये जे वेगवेगळी तेल मिक्स करून खाण्याचे फॅड आले होते ते करू नये. दर महिन्याला वेगवेगळी तेल बदलून तुम्ही वापरू शकता. पण प्रमाण मात्र नक्की पाळावे.हॉर्मोनचे प्रॉब्लेम असणाऱ्यांनी शक्यतो सोयाबीन चे तेल वापरू नये.
(छायाचित्र-गुगल)
फिल्टर तेल वापरावं की घाण्याचं?
तर घाण्याचं तेल वापरलेलं कधीही चांगलं, फिल्टर करण्याच्या प्रक्रियेत तेलातले चांगले घटक सुद्धा निघून जातात.
एकदा तळलेले तेल परत वापरावे का?
अजिबात नाही, तेलाला वारंवार गरम केल्यामुळे त्यात असे काही घटक निर्माण होतात जे ह्रदयासाठी अत्यंत धोकादायक असतात.आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकदम १५ लिटर किंवा ५ लिटर चा तेलाचा डब्बा आणू नये त्या ऐवजी १ लिटरचे पाऊच मिळतात ते आणावे कारण एकदा का तेलाचा हवेशी संपर्क आला की त्यात ऑक्सिडेशन ची प्रक्रिया सुरू होते, आणि त्या प्रक्रियेतून सुद्धा शरीराला घातक असे घटक तयार होतात. त्यामुळे १ लिटर तेल हवाबंद डब्यात काढूनच वापरावे.
(छायाचित्र-गुगल)
कोणते तेल वापरावे?
चांगल्याकडून कमी गुणवत्ता असलेल्या तेलाचा क्रम देते आहे पण तरीही प्रमाण मात्र ४०० मिली लिटर प्रति व्यक्ती प्रति महिना हेच असायला हवं.1. ऑलिव्ह ऑइल2 तिळाचे तेल3 सूर्यफूल तेल4 राईस ब्रांन तेल5सोयाबीन तेल6. खोबऱ्याचं तेल7. पाम तेल8. वनस्पती तूपआता सांगा बरं तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत आणि तुम्ही महिन्याला किती तेल वापरता?