पुऱ्या करण्याची, त्या लाटण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत. कोणी कणकेचे छोटे छोटे उंडे म्हणजेच गोळे आधी करून घेतात आणि मग त्याच्या एकसारख्या आकाराच्या पुऱ्या लाटतात. काही जणी पोळीपेक्षा मोठी पुरी लाटतात आणि मग वाटीने तिचे एकसारखे छोटे छोटे काप करतात. पुऱ्या करताना त्यात कोणते पदार्थ घालायचे, हे देखील प्रत्येक घरानुसार वेगवेगळं असतं. म्हणूनच तर पुरी लाटताना ती तेल लावून लाटावी की पीठ लावून लाटावी (Oil or floor- what should we apply while making poori?), याबाबतचे नियमही प्रत्येक घरात वेगवेगळे पाहायला मिळतात. यातलं नेमकं काय योग्य आणि काय चुकीचं हे आता पाहूया....(How to make poori that does not soak more oil?)
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी याबाबतचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये स्टफ पुरी करताना ती कशी भरायची, कशी लाटायची आणि कशी तळायची अशी माहिती त्यांनी शेअर केलेली आहे.
चारचौघात बोलण्याची भीती वाटते- कॉन्फिडन्सच गेलाय? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, भीती जाईल पळून
त्यांच्या या व्हिडिओमधला पुरी कशी लाटायची याबाबत सांगितलेला मुद्दा प्रत्येकीसाठीच कोणतीही पुरी लाटताना उपयोगी ठरावा असाच आहे. एवढंच नाही, तर आता गणेशउत्सवात तळणीचे मोदक करताना आपण आधी छोट्या पुऱ्या लाटतो आणि मग त्यात सारण भरतो. या पुऱ्या लाटतानाही त्याला तेल लावावं की पीठ, हे लक्षात येण्यासाठी कुणाल कपूर यांनी सांगितलेली ही माहिती वाचायलाच पाहिजे.
पुरी लाटताना पुरीला तेल लावावं की पीठ?
याविषयी सांगताना सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर असं म्हणतात की पुऱ्या लाटताना त्यांना पीठ लावणं टाळलं पाहिजे. पुऱ्या नेहमी तेल लावून लाटाव्या.
सादळलेला चिवडा - शेव टाकून देऊ नका; करा ३ पदार्थ, मिटक्या मारत सगळे खातील- बघा रेसिपी
कारण जेव्हा आपण पीठ लावून लाटलेली पुरी कढईत तळायला टाकतो, तेव्हा तिला लावलेले पिठाचे कण सुटतात आणि कढईत तळाला साचत जातात. जसं जसं आपण तळत जातो, तसं तसं कढईच्या तळाला पिठाचा थर साचत जातो. तेलाचं तापमान खूप वाढलं की तो थर करपू लागतो. मग करपलेल्या पिठाचा वास पुरीला येऊ लागतो. यामुळे तेल आणि पदार्थ दोन्हीही खराब होतात. त्यामुळे पुऱ्या नेहमी तेल लावून लाटाव्या, असं कुणाल कपूर सांगतात.