Lokmat Sakhi >Food > अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...

अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...

One Plate Idli Costs 500 Rupees In Chennai: तब्बल ५०० रुपयांना मिळणारी चेन्नईची ती खास इडली बघा आहे तरी कशी... (idli which helps to control blood sugar level)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2024 03:07 PM2024-07-01T15:07:56+5:302024-07-01T15:08:38+5:30

One Plate Idli Costs 500 Rupees In Chennai: तब्बल ५०० रुपयांना मिळणारी चेन्नईची ती खास इडली बघा आहे तरी कशी... (idli which helps to control blood sugar level)

one plate idli costs 500 rupees in chennai, viral video of costly idli which helps to control blood sugar level | अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...

अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...

Highlightsआपल्या पारंपरिक इडलीमध्ये आणखी वेगवेगळे पदार्थ टाकून तिला अधिकाधिक पौष्टिक करण्याचा प्रयत्न या रेसिपीतून करण्यात आला आहे.

इडली हा बहुतांश लोकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. दक्षिण भारतातला तर तो एक मुख्य पदार्थ आहेच. पण त्यासोबतच भारताच्या इतर प्रांतातही तो अतिशय लोकप्रिय आहे. बऱ्याच घरांमध्ये इडली सांबार किंवा इडली चटणी नेहमीच होते. पण तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात तरी अगदी स्वस्तात मस्त आणि पोटभर नाश्ता करायचा असेल तर इडली सांबार हा एक उत्तम पर्याय आहे. पण हीच स्वस्त इडली चेन्नईच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चक्क ५०० रुपयांना मिळते आहे. ती एक प्रकारची डाएट इडली असून ती रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारी आहे (one plate idli costs 500 rupees in Chennai). या इडलीमुळे मधुमेह, रक्तदाब तर नियंत्रित राहीलच पण हृदयाचे आरोग्यही उत्तम राहील असं सध्या व्हायरल असणाऱ्या एका इस्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. (idli which helps to control blood sugar level)


 
“revolution in nutrition” असं म्हणून ही इडली सध्या प्रसिद्ध होत आहे. आपल्या पारंपरिक इडलीमध्ये आणखी वेगवेगळे पदार्थ टाकून तिला अधिकाधिक पौष्टिक करण्याचा प्रयत्न या रेसिपीतून करण्यात आला आहे.

बघा सध्या सुपरहीट असणारा '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला- सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झटपट कमी करा...

तुमच्या घरातही रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग या आजारांचे रुग्ण असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी घरच्याघरी ही खास इडली करू शकता. ही इडली आणि तिच्यासाठी असणारं विशिष्ट सांबार तयार करण्यासाठी नेहमीच्या पदार्थांसोबतच ब्लू बेरी, भिजवून सालं काढून घेतलेले बदाम, ऑलिव्ह ऑईल, केशर, साजूक तूप, अश्वगंधा, मशरुमचा अर्क आणि कोथिंबीर हे खास पदार्थही वापरण्यात आलेले आहेत. हे पदार्थ सहसा आपण इडली करण्यासाठी कधीच वापरत नाही. 

 

त्यामुळे ही इडली अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांसाठीच उत्तम आहे, असं इडली तयार करणाऱ्या रेस्टॉरंटने सांगितलं आहे.

स्वयंपाक खूपच उरला? अन्न वाया न घालवता करा ६ चमचमीत पदार्थ- बघता बघता होतील फस्त

काही लोकांना इडली तयार करण्याची ही नवी कल्पना अतिशय आवडली आहे, तर काहींना ती मुळीच पटलेली नाही. हे सगळे पदार्थ न टाकता तयार होणारी इडलीही पौष्टिकच असते, असं त्यांचं मत आहे. 

 

Web Title: one plate idli costs 500 rupees in chennai, viral video of costly idli which helps to control blood sugar level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.