Join us  

कांदा भजी कुरकुरीत होत नाहीत? मऊ पडतात? त्यात घाला '१' मसाला'; भजी होतील परफेक्ट क्रिस्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 7:18 PM

Onion Bhaji Recipe (Indian Restaurant Style) : हॉटेलसारखी कुरकुरीत कांदे भजी होतील घरीच; पाहा भजी करण्याची सोपी ट्रिक

पावसाळा सुरु झाला की लोकांना भजी खाण्याचे वेध लागते (Onion Pakoda). कांदा, बटाटे, विविध भाज्यांची भजी केली जातात. त्यात कांदा भजी फार फेमस आहे. कांदा भजी आपण सहसा बाहेरून आणून खातो (Food). कारण घरात भजी करताना त्या मऊ होतात, कुरकुरीत होत नाहीत. कांदा भजी हा पदार्थ कांदा, बेसन, आणि काही मसाले घालून केला जातो (Cooking Tips).

जर घरात हॉटेलसारखी कुरकुरीत कांदा भजी तयार होत नसतील तर, एका जबरदस्त ट्रिकचा वापर करून पाहा. कुरकुरीत कांदा भजी काही मिनिटात तयार होतील, शिवाय लगेच मऊ पडणार नाही. चला तर मग पावसाळ्यात कुरकुरीत कांदे भजी कशी करायची पाहूयात(Onion Bhaji Recipe (Indian Restaurant Style)).

कुरकुरीत कांदा भजी कशी करायची?

लागणारं साहित्य

कांदे

बेसन

फोडणीची पोळी नेहमीचीच, करून पाहा चमचमीत टिक्की; चविष्ट नाश्ता रेसिपी - टिफिनसाठी बेस्ट

मीठ

ओवा

धणे

हिरवी मिरची

कडीपत्ता

तेल

कृती

सर्वात आधी २ मोठे कांदे उभे चिरून घ्या. आपण कांदे किसून देखील घेऊ शकता. नंतर त्यात चवीनुसार मीठ, एक चमचा ओवा, एका चमचा धणे, २ बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून मिक्स करा.

जान्हवी कपूरला आवडतो तसा करा मुगाचा डोसा, वाटीभर हिरव्या मुगाचा झटपट पदार्थ-वजन वाढवत नाही

नंतर त्यात एक कप बेसन घालून मिक्स करा. बॅटर करताना त्यात पाणी घालू नका. पाणी घातल्यानंतर कांदे भजी मऊ होऊ शकतात. त्यामुळे पाणी घालणं टाळा.

एकीकडे कढईमध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर  त्यात भजी सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. कांदा भजी नेहमी कडकडीत तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत कांदे भजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स