Join us  

ना बेसन - ना थेंबभर पाणी; हॉटेलसारखी कुरकुरीत खेकडा भजी करा घरीच; अगदी १० मिनिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 10:00 AM

Onion Bhajis (Moong Dal) - Crispy, Crunchy Goodies : तेल न पिणारे कुरकुरीत खेकडा भजी कशी करायची पाहा..

गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे (Cooking Tips). हवेतही चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. अशावेळी आपल्याला टपरीवरची किंवा गाडीवरची गरमागरम भजी खायची इच्छा होते (Kitchen Tips). त्यासोबत वाफाळता चहा असेल तर विचारायलाच नको. पण पावसाच्या दिवसात बाहेर जाण्यापेक्षा, घरातच खेकडा भजी करता आली तर? पण घरात खेकडा भजी तयार होते नाही.

भजी मऊ होतात, कुरकुरीत होत नाहीत. जर आपल्याला घरातच कुरकुरीत कांदा भजी करायची असेल तर, या रेसिपीला फॉलो करून पाहा. अगदी काही मिनिटात पिठाचा वापर न करता, कुरकुरीत खेकडा म्हणजेच कांदा भजी रेडी होईल. कोणत्याही पिठाचा वापर न करता कुरकुरीत कांदा भजी कशी करायची? पाहा(Onion Bhajis (Moong Dal) - Crispy, Crunchy Goodies).

कुरकुरीत खेकडा भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

मूग डाळ

पाणी

हिरवी मिरची

लसूण

कांदा

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

लाल तिखट

हळद

धणे पूड

जिरे पूड

कोथिंबीर

तेल

मीठ

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप मूग डाळ घ्या. त्यात पाणी घालून मूग डाळ धुवून घ्या, नंतर त्यात पाणी घालून डाळ भिजत ठेवा. ४ ते ५ तास डाळ भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, आलं घालून पेस्ट तयार करा.

व्यायामाला वेळ नाही - तोंडाचाही ताबा सुटतो? ४ स्मार्ट गोष्टी करा; दिसाल सुडौल - राहाल कायम फिट

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात उभा बारीक चिरलेला कांदा, एक चमचा लाल तिखट, हळद, धणे पूड, जिरे पूड, २ चमचा भिजेलेली मूग डाळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा.

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात भजी सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे खेकडा भजी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स