Lokmat Sakhi >Food > कांदा कढी, नेहेमीच्या आंबटगोड कढीला द्या टेस्टी पर्याय; ही कढी तुम्ही कधी खाल्ली नसेल..

कांदा कढी, नेहेमीच्या आंबटगोड कढीला द्या टेस्टी पर्याय; ही कढी तुम्ही कधी खाल्ली नसेल..

रात्रीच्या जेवणाला भातासोबत काहीतरी वेगळं, रुचकर हवं असल्यास तेही झटपट तर कांद्याची कढी उत्तम पर्याय आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 06:22 PM2021-10-19T18:22:20+5:302021-10-19T18:25:01+5:30

रात्रीच्या जेवणाला भातासोबत काहीतरी वेगळं, रुचकर हवं असल्यास तेही झटपट तर कांद्याची कढी उत्तम पर्याय आहे.

Onion curry, a tasty alternative for usual kadhi, You may have never eaten this curry. | कांदा कढी, नेहेमीच्या आंबटगोड कढीला द्या टेस्टी पर्याय; ही कढी तुम्ही कधी खाल्ली नसेल..

कांदा कढी, नेहेमीच्या आंबटगोड कढीला द्या टेस्टी पर्याय; ही कढी तुम्ही कधी खाल्ली नसेल..

Highlights कांद्याच्या कढीसाठी कांदा जरा जास्त हवा आणि लांबसर कापलेला हवा.कांद्याची कढी मोहरीच्या तेलाच्या फोडणीनं रुचकर लागते.

गोड कढी, आंबट कढी , सिंधी कढी असे कढीचे विविध प्रकार आहेत. त्यातला एक चविष्ट प्रकार म्हणजे कांद्याची कढी. कांद्याची कढी ही रुचकर लागते आणि लवकर तयार होते. नेहेमीपेक्षा वेगळं आणि झटपट काही हवं असल्यास कांद्याची कढी हा उत्तम पर्याय आहे.

Image: Google

कशी करावी कांद्याची कढी?

कांद्याची कढी करण्यासाठी दोन कप दही, 1 ते दिड मोठा चमचा बेसन पीठ, हिंग, एक मोठा कांदा, 3 आख्ख्या लाल मिरच्या, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, मीठ, मोहरी, मोहरीचं तेल, थोडं पाणी आणि कोथिंबीर.
कांद्याची कढी तयार करण्यासाठी सर्वात आधी दही फेटून ते पातळ करुन घ्यावं. फेटलेल्या दहीत एक ते दीड चमचा बेसन पीठ घालावं. ते चांगलं मिसळून घ्यावं. बेसन घातलेल्या दह्यातच थोडा हिंग घालावा. एक कांदा लांबसर कापून घ्यावा. आणि आख्या लाल मिरचीचे थोडे मोठे तुकडे करुन घ्यावेत.

Image: Google

कांद्याची कढी करताना एका कढईत मोहरीचं तेल घ्यावं. कांद्याची कढी मोहरीच्या तेलात छान लागते. त्यात मोहरी आणि अख्खी लाल मिरची घालावी. मिरची परतल्यावर त्यात लाल तिखट, हळद आणि धने पावडर घालावी. मसाले नीट मिसळले की त्यात थोडं पाणी घालावं. पाण्याला उकळी काढावी. नंतर त्यात कापलेला कांदा घालावा. कांदा चांगला परतून घ्यावा. कांद्या परतल्यावर मग त्यात हळूहळू दही घालावं. दही घातल्यानंतर कढी सारखी हलवत राहावी. गॅसची आच वाढवून कढी हलवत राहावी. कढी उकळली की गॅस मंद आचेवर करुन कढी पंधरा मिनिटं उकळू द्यावी. गॅस बंद करण्याआधी कढीत मीठ आणि थोडा गरम मसाला घालावा. कढी जास्तच आंबट हवी असल्यास त्यात थोडं लिंबू पिळून टाकावं. आणि गॅस बंद केल्यावर कोथिंबीर चिरुन घालावी.

Web Title: Onion curry, a tasty alternative for usual kadhi, You may have never eaten this curry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.