Lokmat Sakhi >Food > कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं? ५ ट्रिक्स, डोळ्याची आग न होता कांदे चिरा झरझर

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं? ५ ट्रिक्स, डोळ्याची आग न होता कांदे चिरा झरझर

Onion cutting hack : शेफ पंकजने असे हॅक्स सांगितले आहेत, ज्याच्या मदतीने कांदा चिरणे खूप सोपे होईल. (How to prevent tears while cutting onions by chef pankaj)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 03:26 PM2023-04-06T15:26:02+5:302023-04-06T15:32:56+5:30

Onion cutting hack : शेफ पंकजने असे हॅक्स सांगितले आहेत, ज्याच्या मदतीने कांदा चिरणे खूप सोपे होईल. (How to prevent tears while cutting onions by chef pankaj)

Onion cutting hack : How to prevent tears while cutting onions by chef pankaj | कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं? ५ ट्रिक्स, डोळ्याची आग न होता कांदे चिरा झरझर

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं? ५ ट्रिक्स, डोळ्याची आग न होता कांदे चिरा झरझर

कांदा असा पदार्थ आहे जो रोजच्या खाण्यात वापरला जातो. भाजी, पराठे, पुलाव, डाळ, भजी, वडे बनवताना कांदा वापरला जातो. जेवणातल्या प्रत्येक पदार्थांत कांदा असतोच तर काहीजणांना कच्चा  खायला खूप आवडतं. पण नेहमी कांदा कापताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. (Onion cutting hack) कारण कांदा कापताना डोळ्यात जळजळ होते, जी बराच वेळ जाणवते. जर तुम्हालाही असा त्रास जाणवत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.  शेफ पंकजने असे हॅक्स सांगितले आहेत, ज्याच्या मदतीने कांदा चिरणे खूप सोपे होईल. (How to prevent tears while cutting onions by chef pankaj)

ट्रिक १

सर्व प्रथम कांदा सोलून घ्या.  नंतर कांदा मधोमध कापून घ्या म्हणजे दोन भाग करा. आता एका भांड्यात पाणी भरा, पाणी गरम नसावे. नंतर कांद्याचे दोन्ही अर्धे भाग पाण्यात टाकून भिजवावे. सुमारे 10 ते 15 मिनिटे कांदे असेच राहू द्या. आता कांदा चिरायला तयार आहे.

ना खवा ना पाक, मूठभर शेंगदाण्याची मोजून ७ मिनिटांत करा मस्त बर्फी, पाहा रेसिपी

ट्रिक २

या ट्रिकसाठी तुम्हाला फक्त च्युइंग गम लागेल, जे तुम्हाला कांदा कापताना चघळायचे आहे. तुम्हाला च्युइंग खाण्याचा आनंद तर मिळेलच, पण तुमच्या डोळ्यांतही पाणी येणार नाही.

ट्रिक ३

कांदे धुण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. कारण कोमट पाणी कांद्यामध्ये असलेला सुगंध काढण्यास मदत करते. त्याच वेळी, आपण कांद्यामध्ये उपस्थित बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थांपासून मुक्त होऊ शकता. यासाठी कांदा सोलल्यानंतर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर वापरा.

१ कप तांदळाचे करा १० ते १५ जाळीदार डोसे; १० मिनिटात तयार होतील मऊ मस्त डोसे

कांदा कसा धुवायचा?

सर्व प्रथम बाजारातून ताजे कांदा खरेदी करा. बाजारातून आणल्यानंतर गरम पाण्यात भिजवा. 5 मिनिटांनंतर सालं हातांनी चोळा आणि कांदा स्वच्छ करा. कांद्याची सर्व सालं काढून टाकल्यावर तो स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडा होण्यासाठी ठेवा.

Web Title: Onion cutting hack : How to prevent tears while cutting onions by chef pankaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.