Join us  

कांद्याचा कुरकुरीत डोसा खाऊन तर पाहा! १० मिनिटात इन्स्टंट रेसिपी; नाश्ता टेस्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 10:05 AM

Onion Dosa Recipe Crispy & Instant Roast Dosa : साधा - मसाला डोसा आपण खाल्लाच असेल; आता कांद्याचा डोसा करा

साऊथ इंडिअन पदार्थांमध्ये डोसा हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो (Onion Dosa). डोश्यामध्येही अनेक प्रकार आहेत. मसाला, साधा, मैसूर डोसा आपण खाल्लाच असेल. डाळ - तांदूळ भिजत घालायला वेळ नसेल तर, आपण रवा किंवा तांदुळाचा इन्स्टंट डोसाही करतो (Cooking Tips). कुरकुरीत डोसा नाश्त्याला खायला अनेकांना आवडतं. पण आपण कधी कांद्याचा कुरकुरीत डोसा करून पाहिलं आहे का?

कांद्याचा वापर आपण सहसा फोडणीसाठी किंवा भजीसाठी करतो. आता कांद्याचा कुरकुरीत डोसा करून पाहा. अगदी १० मिनिटात इन्स्टंट कुरकुरीत कांद्याचा डोसा तयार होतो(Onion Dosa Recipe Crispy & Instant Roast Dosa).

४ चुकांमुळे वॉशिंग मशीन होऊ शकतं लवकर खराब- वीजबिलही येईल जास्त; वेळीच या चुका टाळा..

कांद्याचा कुरकुरीत डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाच पीठ

रवा

दही

मीठ

पाणी

कांदा

हिरवी मिरची

जिरे

चांदीच्या जोडव्यांची पाहा ७ ट्रेण्डी - नाजूक डिझाईन; नजरा पायांवरच खिळतील

हिंग

हळद

तिखट

धणे पावडर

कृती

कांद्याचा कुरकुरीत डोसा करण्यासाठी एका भांड्यात तांदुळाचं पीठ घ्या. त्यात रवा, दही, मीठ आणि पाणी घालून साहित्य एकजीव करा. १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवा. जेणेकरून रवा व्यवस्थित भिजेल.

आता दुसरी वाटी घ्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, जिरे आणि हिंग घालून मिक्स करा. तसेच हळद, तिखट आणि धणे पावडर घालून मिक्स करा. तयार बॅटरमध्ये कांद्याच मिश्रण घालून मिक्स करा.

नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यात थोडे तेल पसरवा. चमचाभर तयार बॅटर पसरवून डोसा तयार करा. डोसा दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे कांदा डोसा खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स