नेहमी नेहमी तेच खाऊन कंटाळा आला की भाजीला काय करावं सुचत नाही. घरात भाजीपाला नसेल तर तुम्ही एक कांदा चिरून कांद्याची भाजी करू शकता. (Cooking Hacks & Tips) कांद्याची भाजी चवी उत्तम लागते. भाकरी, भात किंवा चपातीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. कांद्याची भाजी ५ मिनिटांत कशी करावी याची सोपी रेसेपी पाहूया. (How to make onion sabji) दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही भाजी मस्त पर्याय आहे. (Kitchen tips)
साहित्य
१) उभे चिरलेले कांदे -२ ते ३
२) लांबट चिरलेल्या मिरच्या - २ ते ३
३) लाल तिखट- १ चमचा
४) हळद- १ चमचा
५) आमसूल पावडर- १ चमचा
६) जीरं- अर्धा चमचा
७) कलोंजी बिया- अर्धा चमचा
८) बारीक चिरलेली कोथिंबीर- पाव वाटी
कृती
१) कांद्याची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी सगळ्यात आधी २ ते ३ कांदे घेऊन त्याची सालं काढून घ्या. सालं काढल्यानंतर कांदे बारीक उभे चिरून घ्या.
२) त्यानतंर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कलौंजीच्या बीया, हळद घाला. त्याच चिरलेले कांदे घाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३) २ ते ३ मिनिटं शिजवल्यानंतर कांद्याचा रंग बदलू लागेल. कांदे शिजवत असताना चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहा अन्यथा खाली चिकटून कांदे जळू शकतात.
भात गचगचीत होतो कधी करपतो? कुकर लावण्याआधी ३ ट्रिक्स वापरा, दाणेदार-मऊ होईल भात
४) नंतर यात एक ते दोन चिरलेल्या मिरच्या घाला आणि लाल तिखट, गरम मसाला घाला. थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर आमसूल पावडर घाला.
रोजच्या वरणाची चव वाढवणारी पाहा झणझणीत फोडणी, बदला नेहमीची पद्धत- करा ‘अशी’ फोडणी
५) चमच्याच्या साहाय्याने एकजीव केल्यानंतर त्यात कोथिंबीर घाला. १ ते २ मिनिटं शिजवून गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम कांद्याची भाजी. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. फार वेळ न लावता अगदी ५ ते १० मिनिटांत ही भाजी बनवता येते.