Join us  

उपमा कधी फडफडीत तर, कधी गचका होतो? साऊथ इंडियन स्टाईल उपमा करण्याची पाहा सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 2:26 PM

Orignal South Indian Style Upma recipe : अण्णाच्या स्टॉलसारखा मऊ उपमा करण्याची सोपी कृती, एकाच वेळी संपवाल २ प्लेट

ठळक मुद्देकाही वेळेला उपमा फडफडीत तयार होतो. जर आपल्यला साऊथ इंडियन स्टाईल उपमा तयार करायचा असेल, तर या रेसिपीला नक्की फॉलो करून पाहा.

नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थांना पसंती दर्शवली जाते. काहींना नाश्त्यामध्ये पोहे आवडतात, तर काही उपमा (Upma) आवडीने खातात. सकाळच्या घाईगडबडीत उपमा हा पदार्थ झटपट तयार होतो. काही वेळेला आपण अण्णाच्या स्टॉलवरून मऊ उपमा विकत आणतो. अण्णाचा स्टॉल असो किंवा हॉटेलमध्ये, उपमा मऊसूत तयार झाला असेल तर, आपण दोन प्लेट आरामात संपवतो.

पण घरात साऊथ इंडियन स्टाईल उपमा तयार होत नाही. काही वेळेला उपमा फडफडीत तयार होतो. जर आपल्यला साऊथ इंडियन स्टाईल उपमा तयार करायचा असेल, तर या रेसिपीला नक्की फॉलो करून पाहा. साऊथ इंडियन स्टाईल उपमा करून खाल्ल्यानंतर, आपल्या घरातील सदस्य वारंवार याच पद्धतीने उपमा करण्यास सांगतील, यात काही शंका नाही(Orignal South Indian Style Upma recipe).

साऊथ इंडियन स्टाईल उपमा (South Indian Style Upma recipe) करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

तूप

तेल

मोहरी

उडीद डाळ

चणा डाळ

कडीपत्ता

डोसा तव्याला चिकटल्यावर तुटतो? उलथताना लक्षात ठेवा एक सोपी ट्रिक; न तुटता डोसा तव्यावरून सहज निघेल

हिरवी मिरची

आलं

कांदा

काजू

मीठ

साखर

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तूप किंवा तेल घाला, नंतर त्यात २ कप रवा घाला. रवा मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. जर आपल्यला तूप जास्त आवडत असेल तर, आपण त्यात आणखी एक चमचा तुपाचा घालू शकता. भाजलेला रवा एका बाऊलमध्ये काढून घ्या.

पुन्हा त्याच पॅनमध्ये ३ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात एक टेबलस्पून उडीद डाळ, चणा डाळ, १० ते १५ कडीपत्त्याची पानं घालून साहित्य भाजून घ्या. नंतर त्यात ३ ते ४ बारीक चिरलेली हिरवी मिरची, ठेचलेलं आलं आणि एक बारीक चिरलेला मोठा कांदा घालून भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात काजूचे काप घालून साहित्य एकत्रित भाजून घ्या.

डाळीत किडे झाले? ३ सोप्या ट्रिक्स, डाळ निवडून स्वच्छ होईल एकदम झटपट

साहित्य भाजून झाल्यानंतर त्यात ७ कप पाणी, चवीनुसार मीठ व एक चमचा साखर घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. गॅस लो फ्लेमवर ठेवा, व त्यात हळूहळू भाजलेला रवा घालून मिक्स करा, व चमच्याने सतत ढवळत राहा. असे केल्याने रव्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. नंतर त्यात २ चमचे लिंबाचा रस घालून मिक्स करा. व त्यावर झाकण ठेऊन उपमा वाफेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे साऊथ इंडियन स्टाईल उपमा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स