Join us  

अति उकळलेला ‘कडक’ चहा आरोग्यासाठी फार घातक! चहा करताना 3 गोष्टी चुकतात तेव्हा.. धोका.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 6:18 PM

चहा उकळतो, कधी कधी तर आटतो देखील. पण असा अती उकळलेला कडक चहा पिण्याची आवड असणारेही अनेकजण आहेत. पण अभ्यास सांगतो की अस अती उकळ्लेल चहा अमृत नसून विषासमान होतो. असा चहा पिणं आरोग्यासाठी घातक आहे.

ठळक मुद्देदूध घातलेला चहा जास्त उकळला तर त्याचं विष बनतं, असा चहा पिणं आरोग्यासाठी घातकच.थेट दुधात चहा पावडर आणि साखर घालून ते दूध उकळायला ठेवून चहा करणं ही चुकीची पध्दत आहे.दूध घातल्यानंतर चहा तीन मिनिटांपेक्षा जास्त उकळला तर चहा कडू होतो.

 चहाला आता जणू अमृताचा दर्जा मिळाला आहे अशा पध्दतीने चहा पिला जातो. सध्या तर बाहेर नाक्या नाक्यावर अमृततूल्य चहाची दुकानं आहेत आणि प्रत्येक दुकानासमोर चहा पिणार्‍यांची गर्दी असते. घरातही अनेकदा चहा केला जातो आणि पिला जातो. एकीकडे चहा ठेवून दिला की अनेकजणी आपली इतर कामं करत राहातात. चहा उकळतो, कधी कधी तर आटतो देखील. पण असा अती उकळलेला कडक चहा पिण्याची आवड असणारेही अनेकजण आहेत. पण अभ्यास सांगतो की अस अती उकळ्लेल चहा अमृत नसून विषासमान होतो. असा चहा पिणं आरोग्यासाठी घातक आहे.

चहा तशी करायला खूप सामान्य आणि सोपी गोष्ट वाटते. पण सोपी गोष्ट जर चुकीच्या पध्दतीने केली तर मात्र ती आरोग्यासाठी घातक होते. आधी चहा पावडर, साखर घालून खूप उकळणं आणि नंतर दूध घालून चहा खूप उकळणं ही चुकीची पध्दत असल्याचं अभ्यासात म्हटलं गेलं आहे. दूध घातलेला चहा जास्त उकळला तर त्याचं विष बनतं.

Image: Google

परफेक्ट चहा कोणता?

लालसर, काळा आणि दुधाचा अशा प्रकारे चहा करण्याची पध्दत आहे. दूध घालून चहा पिणार्‍यांची संख्या तुलनेनं जास्तच. परफेक्ट चवीचा चहा म्हणून अनेकजण स्पेशल दुधाचा चहा करतात. यात पाणी घातलंच जात नाही. मग थेट दुधात चहा पावडर आणि साखर घालून ते दूध उकळायला ठेवलं जातं. पण हा चहा करण्याची एकदम चुकीची पध्दत म्हटली गेली आहे. परफेक्ट चहा करण्यासठी आधी गॅसवर फक्त पाणी उकळायला हवं.समजा एक कप चहा हवा असल्यास पातेल्यात एक कप पाणी घालावं. ते उकळून घ्यावं. पाण्याला उकळी आली की त्यात चहा पावडर घालावी. चहा पावडर पाण्यात चांगली उकळू द्यावी. याप्रकारे पाणी उकळल्यास चहाला रंग आणि वास दोन्हीही छान येतं. पाण्यात चहा पावडर चांगली उकळली गेली की त्यात दूध घालावं. चहात दूध घातल्यानंतर चहा आणखी पुढे तीन मिनिटं उकळू द्यावा. दूध घातल्यानंतर चहा तीन मिनिटांपेक्षा जास्त उकळला तर चहा कडू होतो. चहाची अशा पध्दतीनं चव कडू झाली तर असा चहा आरोग्यासाठी घातक मानला जातो.

Image: Google

कोणता चहा किती उकळावा?

1. दूध घातलेला चहा करताना आधी पाण्याला उकळी येवू द्यावी. मग चहा पावडर घातल्यावर पाण्यात चहा पावडर पाच मिनिटं उकळून घ्यावी. नंतर दूध घातल्यावर हा चहा तीन मिनिटं उकळावा. आणि गॅस बंद करुन चहा गाळून घ्यावा.

Image: Google

2. ग्रीन टी गरम पाण्यात तीन मिनिटं उकळून मग गाळून घ्यावा. ग्रीन टी हा तीन मिनिटं उकळल्यास चहाला चव चांगली येते सोबतच असा चहा आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.

Image: Google

 3. काळा चहा कितीही उकळावा असं नाही. हा चहा करताना आधी पाणी उकळून घ्यावं. मग चहा पावडर घालून चहा पाच मिनीटं उकळावा. काळा चहा उकळण्याचा हा परफेक्ट टाइम आहे तर ग्रीन टीचा परफेक्ट टाइम आहे तीन मिनिटं.योग्य पध्दतीनं केलेला, प्रमाणशीर उकळलेला चहा जर मातीच्या कपात पिला तर त्याचा आरोग्यास जास्त फायदा मिळतो.