Join us  

मसाला चहा तर नेहमीचाच ! कधी पहाडी मसाला चहा प्यायला का? एकदा पिऊन बघा 'असा' फक्कड चहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 3:19 PM

Pahadi Chai : Refreshing & Aromatice Pahadi Masala Tea Recipe : How to make a perfect Pahadi Masala Tea : गरमागरम वाफाळता पहाडी मसाला चहा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी...

चहाच्या चाहत्यांची जगभरात कुठेही कमी नाही. चहा हे अनेकांचे आवडीचे पेय आहे. आपल्यापैकी काहीजणांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. सकाळचा चहा प्यायला नाही तर अनेकांना दिवस सुरु झाल्यासारखे वाटतच नाही. चहाचे अनेक प्रकार आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. चहा जरी एक पदार्थ असला तरीही तो तयार करण्याची प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असते. मसाला चहा, गुळाचा चहा, बासुंदी चहा असे चहाचे अनेक प्रकार असतात. काहीजण चहा तयार करताना तो हेल्दी किंवा अधिक चविष्ट होण्यासाठी त्यात अनेक प्रकारचे पदार्थ घालतात(Pahadi Masala Tea).

चहा तयार करताना त्यात आलं, साखर, चहा पावडर, दूध असे कॉमन पदार्थ तर आपण घालतो. याचबरोबर चहाला टेस्ट येण्यासाठी त्यात चहा मसाला देखील घातला होतो. असाच चहाचा एक नवीन प्रकार म्हणजे पहाडी मसाला चहा. हा फक्कड चहा तयार करण्यासाठी यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्यांचे पदार्थ घालून हा पहाडी मसाला चहा (How to make a perfect Pahadi Masala Tea) तयार केला जातो. या पहाडी मसाला चहा (Pahadi Chai) मध्ये अनेक मसाल्यांचे पदार्थ असल्यामुळे हा चहा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हेल्दी होतो. याचबरोबर यात असणारे वेगवेगळे पदार्थ आपल्या शरीराला अतिशय गुणकारी ठरतात(Refreshing & Aromatice Pahadi Masala Tea Recipe).

साहित्य :- 

१. आलं - छोटा तुकडा (स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला)२. तुळशीची पाने - ५ ते ६ पाने ३. पुदिना - १० ते १२ पाने ४. लवंग - ३ ते ४ लवंगांच्या काड्या५. वेलची - ३ ते ४ ६. दूध - १ कप ७. चहा पावडर - १ टेबलस्पून ८. गूळ - १ टेबलस्पून ९. पाणी - १ कप 

तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी...

आंबटगोड चिंच  टिकेल वर्षभर, पाहा पारंपरिक पद्धत - चिंच पावसाळ्यातही खराब होणार नाही...

कृती :- 

१. सर्वप्रथम खलबत्त्यात आलं, तुळशीची पाने, पुदिना, लवंग, वेलची असे सर्व जिन्नस घालून त्याची थोडी जाडसर भरड होईल असे वाटून त्याचा मसाला तयार करून घ्यावा.  २. आता एका टोपात पाणी घेऊन त्यात हा तयार मसाला घालावा. पाण्यात हा मसाला २ ते ३ मिनिटे व्यवस्थित उकळवून घ्यावा. ३. त्यानंतर पाण्यात चहा पावडर घालूंन ती चमच्याने हलवून ढवळून घ्यावी. 

दूध वारंवार नासतं? त्यात मिक्स करा चिमूटभर १ खास पदार्थ, दूध नासणार नाही... 

४. आता या तयार चहामध्ये दूध घालूंन एक उकळी काढून घ्यावी. ५. उकळी आल्यानंतर गॅसची आच थोडी मंद करून त्यात गूळ बारीक करून घालावा. गूळ घातल्यानंतर चहाला पुन्हा एक उकळी काढून घ्यावी. 

आपला पहाडी मसाला चहा पिण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती