Join us  

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात ‘पहाडी रायता’ रेसिपी, करायला एकदम सोपी- चव चटकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 2:18 PM

How to Make Pahadi Raita: सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली पहाडी रायता ही चटपटीत चवदार रेसिपी (Pahadi Raita recipe by celebrity chef Kunal Kapur) एकदा करून बघा.... जेवणात रंगत येईल.

ठळक मुद्देत्याच नेहमीच्या रायत्याला थोडंसं झणझणीत, चटपटीत, चवदार कसं करायचं, हे सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलं आहे.

चटणी, कोशिंबीर, लोणचं, रायते असे वेगवेगळे पदार्थ जेवणात तोंडी लावायला असले की जेवणाची चव कशी वाढत जाते. काकडीचं, कांद्याचं, बीटचं रायते आपण नेहमीच करतो (Raita recipe). पण आता त्याच नेहमीच्या रायत्याला थोडंसं झणझणीत, चटपटीत, चवदार कसं करायचं, हे सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलं आहे. 'पहाडी रायता' (How to Make Pahadi Raita) ही एक छानशी रेसिपी त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे (Raita recipe by celebrity chef Kunal Kapur). जेवणात थोडीशी वेगळी चव येण्यासाठी ही सोपी रेसिपी करून बघायला हरकत नाही. कुणाल कपूर यांनी पहाडी रायता करण्यासाठी पाटा- वरंवटा वापरला आहे. पण आता प्रत्येक घरातच तो उपलब्ध असेल असे नाही. त्यामुळे पाटा- वरवंट्याऐवजी मिक्सर वापरूनही ही रेसिपी करता येते (Cucumber- Curd Pahadi Raita).

 

पहाडी रायता करण्यासाठी लागणारे साहित्य(Ingredients for Pahadi Raita)२ ते ३ हिरव्या मिरच्या

३ ते ४ लसूण पाकळ्या

चिमूटभर हळद 

चिमूटभर लाल तिखट 

अर्धी वाटी कोथिंबीर 

अर्धी वाटी पुदिना

एक काकडी 

एक वाटी दही आणि 

चवीनुसार मीठ.

 

कसा करायचा पहाडी रायता?(How to Make Pahadi Raita?)- पहाडी रायता करण्यासाठी सगळ्यात आधी मिरच्या आणि लसूण वाटून घ्या. 

- त्यानंतर त्यात कोथिंबीर आणि पुदिना टाका. त्यावरच थोडसं तिखट आणि हळद टाका. हे सगळे मिश्रण एकत्र करून चांगले एकजीव वाटून घ्या

बीटाचं क्रीम करण्याची भन्नाट कृती, एकदा लावाल तर चेहरा दिसेल चमकदार- सुरकुत्या होतील कमी

- आता काकडी स्वच्छ धुऊन किसून घ्या.

- एका मोठ्या भांड्यात किसलेली काकडी आणि आगोदर वाटून ठेवलेलं मिश्रण एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ टाका आणि दही घाला. 

- आवडत असल्यास चवीसाठी थोडीशी साखरही घालू शकता.

- सगळं मिश्रण छान एकत्र कालवून घेतलं की चटपटीत आणि थोडासा झणझणीत असा पहाडी राहता झाला तयार.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर