पराठे, चिला, बेसन पोळं, चीज पोळी इत्यादी पदार्थ आपण घरी तयार करतो. खासकरून लहान मुलं पोळी भाजी खायला कटकट करतात. ( 'Palak Chila' recipe.. healthy and tasty )त्यांना नुसतं अरबटचरबट खायला हवं असतं. अशावेळी तेलकट, विकतचे पदार्थ खायला न देता मग आपण त्यांना पराठा वगैरे तयार करून देतो. ( 'Palak Chila' recipe.. healthy and tasty )त्यावर थोडं चीज घातलं की मग काय मुलं खुष. साधा चीज पराठा, आलू पराठा तर कधी पनीर पराठा असं आपण त्यांना तयार करून देतो. पाले भाज्या म्हटलं की, लहान मुलंच काय मोठी माणसं सुद्धा नाक मुरडतात. पण पाले भाज्या खाणे गरजेचे आहे. मुलांना पालकही आवडत नाही पण खायला तर घातला पाहिजे. एक काम करा. पालकाचा पराठा तयार करा आणि त्यांना खाऊ घाला. लहान काय आणि मोठे काय सगळेच ताव मारून खातील. ( 'Palak Chila' recipe.. healthy and tasty )
साहित्य
पालक, चीज, बेसन, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, मीठ, जीरं, तूप, पाणी
कृती
१. पालक पाण्यात उकळून घ्या. पालक पटकन शिजतो. फार वाट पहावी लागणार नाही. उकळून झाल्यावर पालक थोडा गार होऊ द्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि पालक घ्या. पेस्ट तयार करून घ्या. जरा पातळच असू द्या.
२. आता एका भांड्यात बेसन घ्या. एक जुडी पालकाला साधारण एक वाटी बेसन पुरेसे आहे. तुमच्या अंदाजाने घ्या. त्यात मीठ, जीरं घाला. पालकाची पेस्ट घाला. मिश्रण नीट एकत्र करून घ्या.
३. एका तव्यावर थोडं तूप घाला त्यावर तयार पीठाचा चिला घाला. थोडंसं जाडस ठेवा.
४. एका बाजूने भाजून झाल्यावर उलथून घ्या. वर आलेल्या बाजूवर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घाला. चीज किसून घाला.
५. दोन मिनटे झाकून ठेवा. आता सॉस बरोबर खा.
फार चविष्ट लागते. गरमागरम खा आणि खाऊ घाला. तुम्हाला आवडत असेल तर पनीरही वापरू शकता. अजून रूचकर आणि पौष्टिक तयार होईल.