Lokmat Sakhi >Food > पालकाची भाजी म्हणताच नाक मुरडणारेही फस्त करतील पालक टिक्की! १० मिनिटांत करा चमचमीत पदार्थ...

पालकाची भाजी म्हणताच नाक मुरडणारेही फस्त करतील पालक टिक्की! १० मिनिटांत करा चमचमीत पदार्थ...

How to make Crispy,Crunchy Palak Tikki At Home : PALAK TIKKI QUICK & EASY SNACK RECIPES : पालकाची गिळगिळीत भाजी आवडत नाही म्हणून अनेकजण पालक खात नाहीत, त्यासाठी हा खास पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 06:44 PM2024-07-23T18:44:23+5:302024-07-23T18:55:31+5:30

How to make Crispy,Crunchy Palak Tikki At Home : PALAK TIKKI QUICK & EASY SNACK RECIPES : पालकाची गिळगिळीत भाजी आवडत नाही म्हणून अनेकजण पालक खात नाहीत, त्यासाठी हा खास पर्याय...

PALAK KI TIKKI SPINACH TIKKI Palak Aloo Tikki Recipe How to make Crispy,Crunchy Palak Aloo Tikki How to make Crispy,Crunchy Palak Tikki At Home | पालकाची भाजी म्हणताच नाक मुरडणारेही फस्त करतील पालक टिक्की! १० मिनिटांत करा चमचमीत पदार्थ...

पालकाची भाजी म्हणताच नाक मुरडणारेही फस्त करतील पालक टिक्की! १० मिनिटांत करा चमचमीत पदार्थ...

आपल्या रोजच्या आहारात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खातो. या पालेभाज्यांमध्ये आपण मेथी, पालक, शेपू अशा भाज्यांचा समावेश करतो.  पालेभाज्या खाणे हे आपल्या आरोग्याचा दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. पालकची भाजी ही एक उत्तम सुपरफूड आहे ज्याचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. परंतु बरेचजण पालेभाज्या म्हटलं की नाक मुरडतात. ताटात पालेभाजी दिसली की जेवण नकोसे वाटते. पालकची भाजी बहुतेकांना आवडत नाही, परंतु याच पालकपासून तयार केलेल्या अनेक प्रकारच्या चटपटीत पदार्थांवर अगदी आवडीने ताव मारला जातो(Palak Aloo Tikki Recipe).

पालकपासून पालक पनीर, पालक पराठा, पालक वडी असे अनेक पदार्थ बनवता येतात. पालकची भाजी न खाणारे देखील पालकपासून तयार झालेले इतर पदार्थ अगदी आवडीने खातात. यामुळे पालकची भाजी खायची नसेल तर त्याचे इतर पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो. यानिमित्ताने हा पौष्टिक पालक देखील आपल्या पोटात जातो व काहीतरी नवीन चटपटीत पदार्थ पाहण्याचा आनंदही मिळतो. अशीच एक सोपी झटपट होणारी पालक टिक्की आपण बनवू  शकतो(How to make Crispy,Crunchy Palak Tikki At Home).  

साहित्य :- 

१. पोहे - १/४ कप (भिजवलेले पोहे)
२. पालक - १ कप (बारीक चिरलेला)
३. बटाटा - २ (उकडवून घेतलेले)
४. गाजर - १/२ कप (बारीक किसून घेतलेले)
५. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
६. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेले)
७. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
८. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
९. मीठ - चवीनुसार 
१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
११. हळद - १/२ टेबलस्पून 
१२. तेल - तळण्यासाठी 
१३. आमचूर पावडर - १ टेबलस्पून 

पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...

हा घ्या ताकदीचा सुपरडोस; १५ मिनिटांत करा मखाण्याचा उत्तपा- नाश्ता हेल्दी, पुरेल दिवसभर एनर्जी...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला पालक, किसलेले गाजर उकडलेला बटाटा कुस्करुन घ्यावा. 
२. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं, चवीनुसार मीठ व हळद, हिरव्या मिरच्या, आमचूर पावडर, भिजवलेले पोहे, लिंबाचा रस घालावा. 

मूगडाळ-पनीर चिला म्हणे जान्हवी कपूरला आवडतो फार, पाहा आपल्या पारंपरिक धिरड्याचाच नवा प्रकार...

३. आता हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. 
४. त्यानंतर या मिश्रणाच्या छोट्या गोलाकार आकाराच्या टिक्की बनवून घ्याव्यात. या टिक्कीवर पांढरे तीळ लावून घ्यावेत.  
५. तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर त्या टिक्की दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्याव्यात. 

गरमागरम, चटपटीत पालक टिक्की खाण्यासाठी तयार आहेत. या पालक टिक्की आपण सॉस किंवा दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: PALAK KI TIKKI SPINACH TIKKI Palak Aloo Tikki Recipe How to make Crispy,Crunchy Palak Aloo Tikki How to make Crispy,Crunchy Palak Tikki At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.