Join us  

पालकाची भाजी खायला मुलं नाही म्हणतात? भाग्यश्रीची रेसिपी पाहून करा पालक लबाबदार- सगळ्यांनाच आवडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 3:25 PM

Palak Lababdar Recipe By Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितल्याप्रमाणे एकदा पालकाची भाजी करून पाहा. लहान मुलांसकट घरातल्या सगळ्यांनाच पालक लबाबदार खूप आवडेल. (how to make palak lababdar?)

ठळक मुद्देअभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे त्या पद्धतीने एकदा पालक लबाबदार करून पाहा. पोळी, भाकरी किंवा भातासोबत ही भाजी खा. 

पालक आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे, हे आपल्याला माहिती आहे. पालकामधून कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात मिळते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीदेखील पालक अतिशय चांगला आहे. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीसुद्धा पालक नियमितपणे खाल्ला पाहिजे. पण तरीही पालकाचे एवढे फायदे असूनही लहान मुलांसकट घरातली मोठी मंडळीही पालकाची भाजी बघितली की नाक मुरडतात (Palak Lababdar Recipe By Actress Bhagyashree). म्हणूनच आता अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे त्या पद्धतीने एकदा पालक लबाबदार करून पाहा.(how to make palak lababdar?)

पालक लबाबदार रेसिपी 

 

साहित्य 

२ चमचे तूप 

१ टीस्पून जिरे 

१ टेबलस्पून धणे

कतरिना कैफ सांगते लिपस्टिक लावण्याची तिची खास पद्धत- म्हणते मी कधीच लिपस्टिक ओठांवर....

२ ते ३ काश्मिरी लाल मिरची

 १ टेबलस्पून शेंगदाणे 

१ टेबलस्पून भिजवलेली हरभरा डाळ 

३ वाट्या बारीक चिरलेला पालक 

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 

१ मध्यम आकाराचा कांदा 

 

२ ते ३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे 

१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट 

वजन कमीच होत नाही? रोज फक्त १० मिनिटांचा व्यायाम- आठवडाभरात १- २ किलो वजन उतरेल

चवीनुसार मीठ 

कृती 

सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तूप टाकून जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्या. 

या फोडणीमध्येच धने, हरबरा डाळ, शेंगदाणे आणि काश्मिरी लाल मिरच्या टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. परतून घेतलेले पदार्थ थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या. 

 

आता भाजी करण्यासाठी पुन्हा एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्या कढईमध्ये तूप टाकून जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्या, त्यामध्ये आलं- लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, चिमूटभर हळद टाका. 

सणासुदीला अन्नधान्यातली भेसळ वाढते! म्हणूनच हळदीची शुद्धता ओळखण्यासाठी पाहा ३ सोप्या टिप्स

बारीक चिरलेला पालक आणि कोथिंबीर घाला. त्यानंतर सगळ्यात शेवटी मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला टाका. सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. 

थोडी वाफ आली की त्या भाजीत पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून १० ते १२ मिनिटे झाकण ठेवून भाजी चांगली शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. गरमागरम पालक लबाबदार तयार. पोळी, भाकरी किंवा भातासोबत ही भाजी खाऊन पाहा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.