पालक - मेथी या अशा भाज्या आहेत ज्या खाण्यासाठी बरेचजण नाकं मुरडतात. काहीजण या भाज्या आवडीने खातात तर काहींना या भाज्या आवडत नाहीत. असे असले तरीही या दोन भाज्यांच्या वापर करून तयार केलेल्या पुऱ्या मात्र सगळेच आवडीने खातात. पालक - मेथीच्या या खमंग, खुसखुशीत पुऱ्या नाश्त्याला किंवा इतर वेळी छोट्या भुकेसाठी अगदी आवडीने खाल्ल्या जातात. चहाच्यावेळी (a perfect tea time snack recipe) लागणाऱ्या अशा छोट्या भुकेसाठी (Snacks Recipes) आपण काहीच खाल्ले नाही तर ही छोटी भूक आपल्याला वारंवार सतावते. अशा छोट्या भुकेसाठी आपण वेफर्स, बिस्कीट असे पॅकेजिंग केलेले पदार्थ खातो. परंतु असे पॅकेजिंग केलेलं पदार्थ वारंवार खाणे आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकतात. यासाठी चहाच्यावेळी लागणाऱ्या अशा छोट्या भुकेच्यावेळी आपण ड्रायफ्रुट्स, फळ, चणे - शेंगदाणे, घरगुती चिवडा असे पौष्टिक पदार्थ देखील खाऊ शकतो(Crispy Palak - Methi Puri).
दिवसभरात वेळी - अवेळी लागणाऱ्या छोट्या भुकेसाठी वेफर्स, बिस्किट्स, कचोरी, फरसाण असे तेलकट मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी पौष्टिक खाऊ शकतो. पालक - मेथीच्या या खरपूस, खुसखुशीत पौष्टिक पुऱ्या हा नाश्त्यासाठी एक हेल्दी पर्याय होऊ शकतो. या निमित्ताने इतर तेलकट. मसालेदार स्नॅक्स खाणे आपोआप टाळले जाते, यासोबतच पालक - मेथी (Palak Methi Puri) सारख्या भाज्या आपल्या पोटात जातात. पालक - मेथीच्या या कुरकरीत, खुसखुशीत पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी(How to make Methi And Palak Puri at home).
साहित्य :-
१. जिरं - १ टेबलस्पून
२. बडीशेप - १ टेबलस्पून
३. ओवा - १ टेबलस्पून
४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
५. धणे पावडर - १ टेबलस्पून
६. हिरव्या मिरच्या - २ ते ३
७. आल्याचा तुकडा - १ छोटा तुकडा
८. कढीपत्ता - ७ ते ८ पाने
९. पालक - २ कप (पाने बारीक चिरुन घेतलेली)
१०. मेथीची पाने - १ कप (पाने बारीक चिरुन घेतलेली)
११. गव्हाचे पीठ - २ कप
१२. बेसन - १/४ कप
१३. हळद - १/२ टेबलस्पून
१४. मीठ - चवीनुसार
१५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१६. तेल - ५ ते ६ टेबलस्पून
मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...
कोजागरीला मसाला दूध पिण्याचे ५ फायदे, परंपरेत आहेत आरोग्याचे खास वरदान, मनही होईल शांत...
कृती :-
१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात जिरं, बडीशेप, ओवा, पांढरे तीळ, धणे पावडर, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, कढीपत्ता घालून हे सगळे मिक्सरमध्ये बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यावेत.
२. मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी व पालकची पाने घ्यावीत.
३. त्यात गव्हाचे पीठ, बेसन, मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला, हळद, मीठ, लाल तिखट मसाला, तेल घालून हे सगळे मिश्रण एकजीव करून त्याचे पीठ मळून घ्यावे.
हरबरे उकडलेले उरलेले पाणी फेकून देता ? ‘असा’ करा वापर, प्रोटीनचा खजिना - सुधारेल तब्येत...
कोजागरी स्पेशल : मसाला दूध छान घट्ट होण्यासाठी ६ सोपे झटपट पर्याय, मसाला दूध होईल मस्त...
४. पीठ मळून झाल्यावर या पिठाची एक मोठी गोलाकार पोळी लाटून घ्यावी.
५. पोळी लाटून घेतल्यानंतर आपल्याला ज्या आकाराच्या पुऱ्या हव्या आहेत त्या आकाराची वाटी किंवा ग्लास घेऊन त्याच्या वापर करून या पुऱ्या गोलाकार बनवून घ्याव्यात.
६. आता गरम तेलात या पुऱ्या एक एक सोडून दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.
ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...
आपल्या पालक - मेथी पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. गरमागरम चहा सोबत आपण या चटपटीत पुऱ्या खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.