Lokmat Sakhi >Food > ब्रेकफास्ट - शाळेच्या डब्याला करा प्रोटीन पॅक पालक पनीर पराठा, गरमागरम पराठा एकदा खाल तर...

ब्रेकफास्ट - शाळेच्या डब्याला करा प्रोटीन पॅक पालक पनीर पराठा, गरमागरम पराठा एकदा खाल तर...

Palak Paneer Paratha Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच शरीराला पोषण देणारी, चविष्ट अशी ही रेसिपी कशी करायची पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2023 12:09 PM2023-11-06T12:09:31+5:302023-11-06T12:13:44+5:30

Palak Paneer Paratha Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच शरीराला पोषण देणारी, चविष्ट अशी ही रेसिपी कशी करायची पाहूया...

Palak Paneer Paratha Recipe : Breakfast - Protein Pack Palak Paneer Paratha, Hot Paratha If you eat it once... | ब्रेकफास्ट - शाळेच्या डब्याला करा प्रोटीन पॅक पालक पनीर पराठा, गरमागरम पराठा एकदा खाल तर...

ब्रेकफास्ट - शाळेच्या डब्याला करा प्रोटीन पॅक पालक पनीर पराठा, गरमागरम पराठा एकदा खाल तर...

पराठा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मेथीचा किंवा बटाट्याचा पराठा येतो. पण नेहमीपेक्षा थोडा वेगळा आणि तरीही खूप पौष्टीक असा पराठा करायचा असेल तर आज आपण पराठ्याचा एक आगळावेगळा पर्याय पाहणार आहोत. आपण पालकाची भाजी, पुऱ्या, भजी किंवा कधीतरी पराठेही करतो. पण आज आपण पालक पनीर पराठ्याची अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. यामध्ये पालक आणि पनीर दोन्हीही घटक असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच शरीराला पोषण देणारी, चविष्ट अशी ही रेसिपी होते (Palak Paneer Paratha Recipe). 

पालक पनीरमध्ये भरपूर मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. पालक पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने ते हृदय आणि स्नायूंच्या सुरळीत कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पनीरमध्ये असलेली जीवनसत्त्वे B2 आणि B-12 अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात. त्यामुळे हे दोन्ही घटक एकत्रित खाणे आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चांगले असते. पाहूयत पालक पनीर पराठा झटपट कसा करायचा...

साहित्य - 

१. पालक - साधारण २० ते २२ लहान पाने 

२. हिरवी मिरची - ३ ते ४ 

(Image : Google )
(Image : Google )

३. लसूण - ५ ते ७ पाकळ्या

४. गव्हाचे पीठ - २ वाट्या 

५. तेल - २ चमचे

६. मीठ - चवीनुसार 

७. जीरे - १ चमचा 

८. आलं लसूण पेस्ट - १ चमचा 

९. मिरची - १ 

१०. कांदा - १ 

११. जीरे पावडर - १ चमचा 

(Image : Google )
(Image : Google )

१२. पनीर - पाव किलो किसलेले

कृती - 

१. सगळ्यात आधी पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत आणि गरम उकळत्या पाण्यात ५ ते १० मिनीटे चांगली शिजवून घ्यावीत.

२. ही पाने गरम पाण्यातून काढून गार पाण्यात घालावीत आणि मग मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये मिरच्या आणि लसूण घालून याची बारीक प्युरी करुन घ्यावी. 

३. गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ, तेल आणि ही मिक्सर केलेली प्युरी घालून आपण पोळ्यांसाठी मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यावे आणि १० मिनीटांसाठी हे पीठ झाकून भिजत ठेवावे. 

४. एका पॅनमध्ये तेल घालून त्यात जीरे, आलं लसूण पेस्ट आणि मिरचीचे तुकडे बारीक करुन घालावेत. 

५. यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्यात जीरे पावडर, मीठ आवडीनुसार तिखट घालायचे.

६. किसलेले पनीर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. 

७. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून ठेवायचे आणि पालकाच्या पीठाचे गोळे करुन त्याची छोटी पोळी लाटायची.

८. त्यामध्ये पनीरचे मिश्रण भरुन चारही बाजुने चौकोनी घडी घालायची आणि चौकोनी आकाराचे पराठे लाटायचे.

९. गॅसवर तवा गरम करुन त्यावर हे पराठे तेल घालून दोन्ही बाजुने खरपूस भाजून घ्यायचे. 

Web Title: Palak Paneer Paratha Recipe : Breakfast - Protein Pack Palak Paneer Paratha, Hot Paratha If you eat it once...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.