पालेभाज्या पौष्टीक गुणधर्मांनीं परीपूर्ण असतात. पण चवीला कडवट असल्यानं फारश्या हव्याश्या वाटत नाहीत. फक्त लहान मुलंच नाही तर काही मोठा माणसंही जेवणाला पालकाची भाजी खायला नको म्हणतात. पालक पराठे, पालक सूप असे पदार्थ खायला अनेकांना आवडतं. (How to make palak Vadi)एक जुडी पालक वापरून तुम्ही कुरकुरीत, खमंग पालक वड्या बनवू शकता. पालक वड्या करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त घरात उपलब्ध असलेलं बेसिक सामान लागेल. या वड्या तुम्ही आवडीनुसार डिप फ्राय किंवा शेलो फ्राय करू शकता. जेणेकरून त्यातील पोषण मूल्यही तुम्हाला मिळतील. (Palak vadi recipe in marathi)
पालकाचे फायदे
1) पालक लोहाचा चांगला स्त्रोत मानला जातो. ज्या महिलांमध्ये रक्ताची कमरता असते त्यांना पालकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आयर्नच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आहारात पालकाचा समावेश करणं गरेजेजं आहे.
2) पालकात कॅल्शियम आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे हाडं चांगली राहतात. हाडं कमकुवत होणं टाळण्यासाठी पालकाचा आहारात समावेश करा.
3) पालकाची गणना नायट्रेट पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या भाज्यांमध्ये केली जाते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होण्यास मदत होते आणि व्हिटॅमिन-सी आढळतात, जे प्रामुख्याने डोळ्यांच्या मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका कमी करण्यास मदत करतात. पालकाच्या सेवनाने दृष्टी वाढवता येते.