Lokmat Sakhi >Food > धो धो कोसळणाऱ्या पावसात खा खमंग, खुसखुशीत पालक वडी, पौष्टिक वडीची सोपी रेसिपी...

धो धो कोसळणाऱ्या पावसात खा खमंग, खुसखुशीत पालक वडी, पौष्टिक वडीची सोपी रेसिपी...

Crispy Palak Vadi : How To Make Palak Vadi : कोथिंबीर, अळू वडी नेहमीचीच आता करुन पहा झटपट होणारी कुरकुरीत पालक वडी, पावसाळ्यात खाण्यासाठी खास बेत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 08:34 PM2024-06-20T20:34:03+5:302024-06-20T20:57:26+5:30

Crispy Palak Vadi : How To Make Palak Vadi : कोथिंबीर, अळू वडी नेहमीचीच आता करुन पहा झटपट होणारी कुरकुरीत पालक वडी, पावसाळ्यात खाण्यासाठी खास बेत....

Palak Vadi Recipe How To Make Palak Vadi Healthy Palak Recipe Crispy Palak Vadi | धो धो कोसळणाऱ्या पावसात खा खमंग, खुसखुशीत पालक वडी, पौष्टिक वडीची सोपी रेसिपी...

धो धो कोसळणाऱ्या पावसात खा खमंग, खुसखुशीत पालक वडी, पौष्टिक वडीची सोपी रेसिपी...

रोजच्या जेवणात आपल्याला काहीतरी तोंडी लावायला चटकदार हवं असत. अशावेळी आपण लोणचं, पापड, चटणी, वड्या असे अनेक पदार्थ खातो. आपल्या भारतीय थाळीमध्ये तोंडी लावायला म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या (Tea Time Snacks Easy Spinach Snack) बनवल्या जातात. यात कोथिंबीर वडी, अळूची वडी अधिक आवडीने खाल्ली जाते. शक्यतो ज्या पालेभाज्या खाण्यासाठी घरातले नाकं मुरडतात, अशा पालेभाज्यांची वडी (Palak Vadi) बनवली तर ती चटकन खाल्ली जाते(Palak Vadi Recipe).

पालक (Crispy Palak Vadi) ही अशी पालेभाजी आहे, जी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणालाच फारशी आवडत नाही. याच पालकचा वापर करुन आपण झटपट होणारी टेस्टी पालक वडी (Healthy Palak Recipe) बनवू शकतो. जेणेकरुन तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत असा पदार्थ होईल व पालक देखील खाल्ला जाईल. एक जुडी पालक वापरुन आपण खमंग खुसखुशीत पालकाच्या वड्या बनवू शकतो. पालक वडी कशी बनवावी याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Palak Vadi). 

साहित्य :- 

१. पालक - अर्धी जुडी (बारीक चिरलेली)
२. बेसन - १ कप 
३. तांदळाचे पीठ - १/२ कप 
४. सफेद तीळ - १/२ टेबलस्पून 
५. जिरे पावडर - १ टेबलस्पून 
६. धणे पावडर - १/२ टेबलस्पून 
७. हळद - १/२ टेबलस्पून 
८. लाल मसाला - १ टेबलस्पून 
९. लसूण मिरची पेस्ट - १ टेबलस्पून 
१०. कोथिंबीर - १ कप 
११. गुळ आणि चिंचेचा कोळ - १/२ टेबलस्पून 
१२. ओवा - चिमुटभर
१३. मीठ - चवीप्रमाणे
१४. तेल - तळण्यासाठी
१५. पाणी - गरजेनुसार 

फणस कापण्याचा व्याप मोठा, हात-सुरी चिकट होते? ३ सोप्या टिप्स- फणस खा- कापा-बरंका..

कृती :-

१. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला पालक घ्यावा. 
२. यात बेसन, तांदळाचे पीठ, सफेद तीळ, जिरे पावडर, धणे पावडर, हळद, लाल मसाला घालावा. 
३. त्यानंतर यात लसूण मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, गुळ आणि चिंचेचा कोळ, ओवा, चवीनुसार मीठ घालावे. 

टोस्टर वापरूनही करता येईल तंदुरी रोटी, बघा भन्नाट ट्रिक - घरीच करा हॉटेलसारखी तंदूरी रोटी... 

४. आता हे मिश्रण एकजीव करून थोडेसे पाणी घालून जाडसर पीठ मळून घ्यावे. 
५. त्यानंतर एका चाळणीला तेल लावून त्यात तयार मिश्रण ठेवून ते व्यवस्थित वाफवून घ्यावे. 
६. वाफवल्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. 
७. या वड्या गरम तेलात खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. 

पालक वडी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम पालक वडी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.

Web Title: Palak Vadi Recipe How To Make Palak Vadi Healthy Palak Recipe Crispy Palak Vadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.