सणवार, पूजा अशा खास प्रसंगांना प्रसाद म्हणून पंचामृत आवर्जून दिले जाते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पूजेनंतरचा प्रसाद म्हणून रव्याचा शिरा आणि पंचामृत दिले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिले जाते. दूध, दही, तूप, साखर, मध असे अम्रुतासमान पदार्थांचा वापर करुन तयार केलेले म्हणून ते 'पंचामृत'. आपल्या सगळ्यांच्याच घरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. गणपती बाप्पांला आपण इतर गोडधोड पदार्थांसोबत पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवतो. कोणतीही पूजा, नैवेद्य, प्रसाद हा पंचामृताशिवाय अपूर्णच मानला जातो(Panchamruta Ingredients For Puja).
गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आपण पंचामृत दररोज तयार करतो खरे, पण ते तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत आजही बऱ्याचजणांना फारशी माहित नाही. पंचामृत पिण्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु हे पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले असेल तरच त्याचे दुप्पट फायदे आपल्याला मिळतात. यासाठीच पंचामृत तयार करताना त्यातील पाचही घटकांचे योग्य प्रमाण नेमके किती असावे ? आणि पंचामृत तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणते ते पाहूयात(How To Make Panchamrut At Home).
साहित्य :-
१. दूध - १६ चमचे
२. दही - ८ चमचे
३. मध - १ चमचा
४. तूप - २ चमचा
५. साखर - ४ चमचे
मोदकाचे सारण सैल झाले किंवा कडक झाले तर? पाहा सारणाची परफेक्ट कृती- मोदक फसणारच नाहीत...
वाटी- चमच्याने द्या मोदकाला परफेक्ट आकार! नाजूक - सुबक होतील मोदक - पाहा भन्नाट आयडिया...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात दूध घेऊन त्यात दही, तूप, मध, साखर घालून घ्यावे.
२. त्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्रित करुन घ्यावेत. तुम्ही हे मिश्रण हलकेच मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता. यामुळे पंचामृत चांगले मिळून येते.
३. आता त्यावर तुळशीचे पान ठेवावे.
पंचामृत पिण्यासाठी तयार आहे.
तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी...
शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसे करावे ?
१. पंचामृत पिण्याने आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतात, परंतु हे फक्त तेव्हाच शक्य होत जेव्हा पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीनेच तयार केले जाते. पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार करताना त्यातील सगळ्या पदार्थांचे प्रमाण हे अचूक मापानुसारच घेतले पाहिजे. यासाठी जर आपण एक चमचाभर मध घेतले असेल तर त्याच्या दुप्पटीने म्हणजेच दोन चमचा तूप घ्यावे. त्यानंतर तुपाच्या दुपट्टीने साखर घालायची म्हणजेच चार चमचे साखर घालावी. जितक्या प्रमाणात साखर घेतली आहे त्याच्या दुप्पटीने म्हणजेच आठ चमचे दही घ्यावे. याचप्रमाणे जितके दही घेतले आहे त्याच्या दुपट्टीने म्हणजेच १६ चमचे दूध घालावे. अशा प्रकारे आपण शास्त्रोक्त पद्धतीने अगदी परफेक्ट पंचामृत तयार करु शकतो.
२. पंचामृत अधिक गुणकारी व्हावे तसेच ते बाधू नये म्हणून यात तुळशीचे पान आवर्जून घालावे.
३. पंचामृत तयार करताना शक्यतो ते चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये तयार करावे.
४. पंचामृत तयार करुन बराचवेळ ठेऊ नये ते लगेच पिऊन संपवावे. प्रत्येकवेळी पंचामृत ताजे तयार करून घेऊन प्यावे.
५. पंचामृतात तूप आणि मधाचे प्रमाण सारखे नसावे, थोडे कमी - जास्त असावे. आयुर्वेदानुसार तूप आणि मध जर समप्रमाणात खाल्ले तर ते आरोग्याला अपायकारक ठरु शकते.