Lokmat Sakhi >Food > पनीर-चीज टिक्की म्हणजे पोटभर पौष्टिक नाश्ता, मुलंही खुश-म्हणतील आई रोज कर! पाहा रेसिपी

पनीर-चीज टिक्की म्हणजे पोटभर पौष्टिक नाश्ता, मुलंही खुश-म्हणतील आई रोज कर! पाहा रेसिपी

Paneer-Cheese Tikki is a nutritious breakfast, kids will be happy too : घरी पनीर चीज टिक्की तयार करणे अगदीच सोपे. लहान मुलांसाठी तर मेजवानीच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 20:09 IST2025-04-04T20:09:13+5:302025-04-04T20:09:58+5:30

Paneer-Cheese Tikki is a nutritious breakfast, kids will be happy too : घरी पनीर चीज टिक्की तयार करणे अगदीच सोपे. लहान मुलांसाठी तर मेजवानीच.

Paneer-Cheese Tikki is a nutritious breakfast, kids will be happy too | पनीर-चीज टिक्की म्हणजे पोटभर पौष्टिक नाश्ता, मुलंही खुश-म्हणतील आई रोज कर! पाहा रेसिपी

पनीर-चीज टिक्की म्हणजे पोटभर पौष्टिक नाश्ता, मुलंही खुश-म्हणतील आई रोज कर! पाहा रेसिपी

चाट हा प्रकार भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मग त्यामध्ये पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो. या चाटमध्ये आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे टिक्की. (Paneer-Cheese Tikki is a nutritious breakfast, kids will be happy too)आलू टिक्की तर सगळ्यांनी खाल्लीच असेल. चवीला फारच कमाल असते. चमचमीत कुरकुरीत आणि फ्लेवरफुल असते. पण त्याचबरोबर प्रचंड अनहेल्दीही असते. त्यामुळे जास्त वेळा खाता येत नाही. हेल्थ कॉन्शियस लोक तर खातच नाहीत. मात्र एक अशीही टिक्की आहे जी मनसोक्त खाता येते. (Paneer-Cheese Tikki is a nutritious breakfast, kids will be happy too)चवीला मस्तच लागते आणि हेल्दीही असते. 

पनीर चीज टिक्की हा पदार्थ नक्की खाऊन बघा. पनीर शरीरासाठी फार पौष्टिक असते. त्यामुळे अशी टिक्की मुलांनाही खायला द्या. त्यांना चमचमीत आवडेलच आणि पोटात पौष्टिकही जाईल. रेसिपी अगदी सोपी आहे. नक्की करून बघा.

साहित्य
गाजर, कोबी, पनीर, चीज, मीठ, काळीमिरी पूड, कोथिंबीर, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, लाल तिखट, तांदळाचे पीठ, मटार

कृती
१. मटार उकडून घ्या. मऊ होईपर्यंत उकडा. गाजर एकदम बारीक चिरून घ्या. कांदाही छान बारीक चिरा. कोबी व्यवस्थित बारीक किसून घ्या. सिमला मिरची बारीक चिरा. 

२. आलं, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या. त्याची पेस्ट तयार करा. 

३. पनीर किसून घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ घाला. काळीमिरी पूड घाला. चिरलेल्या सगळ्या भाज्या घाला. आलं-लसूण व सिमला मिरचीची पेस्ट घाला. कोथिंबीर बारीक चिरून घाला. लाल तिखट घाला. तसेच उकडलेले मटार कुसकरा आणि मिश्रणामध्ये घाला. चवीपुरते मीठ घाला. आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. पाणी वापरू नका. भाज्यांचे पाणी पीठ मळण्यासाठी पुरेस असते. मिश्रण पातळ करू नका. जरा घट्ट ठेवा. 

४. त्याला  टिक्कीचा गोल आकार द्या आणि त्यामध्ये चीजचा लहानसा तुकडा टाका. तो तुकडा चारही बाजूंनी नीट पॅक करा. नाही तर चीज बाहेर येईल आणि टिक्की फुटेल. एका ताटली मध्ये टिक्की लाऊन घ्या.

५. तेलामध्ये तळूनही करता येईल मात्र मग ते पौष्टिक राहणार नाही. त्यामुळे एका पॅनला थोडे तेल लाऊन घ्या. त्यावर टिक्की लावा आणि छान परतून घ्या. तुपावर परतली तरी छान लागेल आणि आणखी पौष्टिक होईल.  

Web Title: Paneer-Cheese Tikki is a nutritious breakfast, kids will be happy too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.